Sharad Pawar News : शरद पवारांचा 16 नोव्हेंबरला माढा दौरा; बबनराव शिंदेंविरोधात चाचपणी!

Sharad Pawar Madha Tour : राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर शरद पवार पहिल्यांदाच माढा मतदारसंघात जाणार
Sharad Pawr and Babanrao Shinde
Sharad Pawr and Babanrao ShindeSarkarnama
Published on
Updated on

हर्षल बागल

Madha Constituency : राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर शरद पवार पहिल्यांदाच माढा विधानसभा मतदारसंघात येत आहेत. मागील 23 ऑक्टोबर रोजीचा आयोजित दौरा रद्द झाल्यानंतर पुन्हा माढा तालुक्यातील मानेगाव येथे द्राक्ष बागायतदारांच्या वतीने शेतकरी मेळाव्यासाठी शरद पवारांना 16 नोव्हेंबर रोजी निमंत्रित करण्यात आले आहे .

शरद पवारांनी निमंत्रणदेखील स्वीकारले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मात्र, शरद पवारांच्या या दौऱ्याकडे बबनराव शिंदेंविरोधातील शरद पवारांची चाचपणी म्हणूनही पाहिले जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sharad Pawr and Babanrao Shinde
Sharad Koli : ''तुम्ही रात्री बॅनर फाडता तर आम्ही तुम्हाला दिवसा फाडू'' ; ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळींचा इशारा!

द्राक्ष बेदाण्यांचा शालेय पोषण आहारामध्ये समावेश करावा, या मागणीसाठी शरद पवारांकडे माढ्यातील अनेक शेतकऱ्यांनी आजपर्यंत चकरा मारल्या . अखेर शरद पवारांनी त्यांना 16 नोव्हेंबरची वेळ दिली आणि शेतकरी मेळाव्याला येऊन मार्गदर्शन करणार असल्याचेही सांगितले.

माढा तालुक्याला ऊस पट्ट्याला बालेकिल्ला म्हणून पाहिले जाते. या ऊस पट्ट्यातच आमदार बबनराव शिंदे यांचे माढा, करमाळा या तालुक्यांमध्ये अर्धा डझनभर साखर कारखानेही आहेत आणि नक्कीच हे कारखाने पवारांच्या वरदहस्ताशिवाय उभा राहिले नाहीत हे तितकच सत्य आहे. उजनी धरणाच्या पायथ्याला असलेला माढा तालुक्याच्या चारही बाजूला साखर कारखान्यांची धुराडे पाहायला मिळतील. बार्शी, मोहोळ आणि माढा या तीन विधानसभा मतदारसंघाच्या सीमेवरती असलेल्या मानेगावमध्ये द्राक्ष बागायतदारांना भेटण्यासाठी पवार येत आहेत .

Sharad Pawr and Babanrao Shinde
Gajanan Kirtikar : ना मंत्रिपद, ना मानपान...शिंदे गटात गेलेल्या कीर्तिकरांना 'सावत्र'पणाची उपरती...

परंतु या भेटीमध्ये पवार द्राक्ष बागायतदारांबरोबर मार्गदर्शनाबरोबरच राष्ट्रवादी सोडून अजित पवारांकडे गेलेल्या आमदार बबनराव शिंदेंनादेखील कानपिचक्या दिल्याशिवाय सोडणार नाहीत, असंही बोललं जात आहे. त्यामुळेच शरद पवार यांच्या माढा दौऱ्याला विशेष लक्ष आले आहे.

मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार काँग्रेसचे माजी आमदार धनाजीराव साठे यांच्या सुनबाई माढा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष मीनल साठे यांचा विधानसभेसाठी शरद पवारांकडून विचार केला जाऊ शकतो अशीही चर्चा आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात माढा मतदारसंघांमध्ये बबनराव शिंदे यांच्या विरोधात फिल्डिंग लावण्यासाठी पहिली चाचपणी शरद पवारांकडून येणाऱ्या 16 नोव्हेंबरच्या मानेगाव येथील द्राक्ष बागायतदारांच्या शेतकरी मेळाव्यातून होऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com