NCP : जयंत पाटलांच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादीची कोंडी ; आघाडी संपुष्टात येणार

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सुंपष्टात येण्याची चिन्ह आहेत.
Jayant Patil
Jayant Patil sarkarnama

अलिबाग : येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकणात (raigad ) राजकारणाचे वारे वाहण्यास सुरवात झाली आहे. गेल्या निवडणुकीत झालेला पराभव शेकापच्या जिव्हारी लागला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत रायगडमध्ये शेकापचे तीनही उमेदवार पराभूत झाले होते. बंडखोरीमुळे शेकाप (shekap) उमेदवारांचा पराभव झाल्याचा आरोप शेकापच्या नेत्यांनी केला आहे. (Jayant Patil latest news)

काल (गुरुवार) झालेल्या शेकापच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमात शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. "एकदा फसलो पुन्हा नाही फसणार, समविचारी पक्षांना सोबत घेणार," असे ते म्हणाले.

जयंत पाटील म्हणाले, "विधानसभा निवडणुकीत झालेल्या बंडखोरीमुळे शेकाप उमेदवारांचा पराभव झाला, एकदा फसलो असलो तरी यापुढे नाही फसणार, पराभवाचा बदला घेणार,"

जयंत पाटलांच्या या भूमिकेमुळे रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सुंपष्टात येण्याची चिन्ह आहेत.

Jayant Patil
Shiv sena : बंडखोर आमदारांबाबत दानवेंचा मोठा गौप्यस्फोट

राष्ट्रवादीचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील यांनी काही दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाची शेकाप सोबत आघाडी करण्याची तयारी असल्याचे स्पष्ट केले होते. आघाडी संदर्भातील अंतिम निर्णय खासदार सुनील तटकरेच घेतील असे जाहीर केले होते.

यानंतर रोहा येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात खासदार सुनील तटकरे यांनी आम्ही वेट अ‍ॅण्ड वॉचच्या भूमिकेत आहोत. कुठल्याही पक्षाला आम्हाला सोबत घेतल्याशिवाय जिल्हा परिषदेवर सत्ता मिळवता येणार नसल्याचे म्हटले होते. या पार्श्वभूमीवर जयंत पाटलांच्या भूमिकेमुळे रायगडमध्ये पक्षाची वाटचाल होणार आहे.

जुळवून घेणे ही पक्षाची मोठी चूक

जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव न घेता यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. धैर्यशील पाटील यांनी काँग्रेस विचाराशी जुळवून घेणे ही पक्षाची मोठी चूक ठरल्याची भूमिका मांडली. यापुढे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जायला नको अशी मागणी त्यांनी केली. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषद निवडणूकांमध्ये शेकाप राष्ट्रवादी काँग्रेसशी जुळवून घेण्याच्या मन:स्थितीत नसल्याचे दिसते.

राष्ट्रवादीच जबाबदार

विधानसभा निवडणुकीच्या इतिहासात गेल्या वेळी पहिल्यांदाच शेकापचा एकही आमदार रायगड जिल्ह्यातून निवडून आला नव्हता. या पराभवाला राष्ट्रवादी काँग्रेस जबाबदार असल्याचा दावा शेकापनेते वारंवार करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने फसवल्यानेच शेकापचे उमेदवार पराभूत झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com