Maharashtra Cabinet Expansion : शिंदे-फडणवीसांमध्ये अडीच तास खल; तीन दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार?

Mahayuti Government Cabinet Expansion : नवरात्री सुरू होत आहे आणि अशातच राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची जोरदार चर्चा आहे.
Ajit Pawar Devendra Fadnavis Eknath Shinde
Ajit Pawar Devendra Fadnavis Eknath Shinde sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : सर्वोच्च न्यायालयात एकीकडे आमदार अपात्रतेप्रकरणी सुनावणी होत आहे, तर दुसरीकडे येत्या काही दिवसांत राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात बैठक झाल्याची सूत्रांची माहिती आहे.

Ajit Pawar Devendra Fadnavis Eknath Shinde
MLA Disqualification Case: सर्वोच्च न्यायालयाने सुनावल्यानंतर नार्वेकरांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मुंबईत वर्षा निवासस्थानी बैठक झाली. ही बैठक अडीच तास चालली. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारावर मोठा खल झाल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. हा मंत्रिमंडळ विस्तार येत्या १६ किंवा १७ ऑक्टोबरला होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नाराजी दूर करण्याचा प्रयत्न

राष्ट्रवादीचा अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. यामुळे अजित पवार गटात नाराजी वाढत असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्यासह शिंदे गटातील आमदार भरत गोगावलेही मंत्रिमंडळ विस्ताराकडे डोळे लावून आहेत. यामुळे लवकरच मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात आमदारांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. यामुळे या विस्तारात मंत्रिमंडळात कुणा कुणाची वर्णी लागते? याची उत्सुकता आहे.

या मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवार गटाला एक कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्रिपदे मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे. यासोबतच केंद्र सरकारमध्येही अजित पवार गटाला कॅबिनेट मंत्रिपदाची एक जागा दिली जाणार असल्याची चर्चा आहे. अजित पवार गटाकडून कोणाला मंत्रिपद मिळणार याचीही चर्चा आता सुरू झाली आहे.

Ajit Pawar Devendra Fadnavis Eknath Shinde
Kalyan Lok Sabha Constituency : आधी भिडले आता मनोमिलन; कल्याणमध्ये मनसे-शिंदे गटात काय चाललंय ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com