Nana Patole
Nana PatoleSarkarnama

‘शेतकरी रोज आत्महत्या करत आहेत; पण सरकार आपल्याच मस्तीत वागतंय’

शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शिंदे-फडणवीस सरकारचे दुर्लक्ष : नाना पटोले

मुंबई : विरोधी पक्ष नात्याने आम्ही सातत्याने शेतकऱ्यांचे (Farmer) प्रश्न मांडत आहोत. पण, सरकार शेतकरी प्रश्नावर बोलण्यास तयार नाही. पुरवणी मागण्यांमध्ये शेतकऱ्यांसाठी एक रुपयाचेही प्रावधान नाही. सांगली जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने आज मंत्रालयासमोर पेटवून घेण्याचा प्रयत्न केला, तर वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्याने सोमवारी आत्महत्या करून आपले आयुष्य संपवले. शेतकऱ्याला मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर मारहाण करण्यात आली, शेतकरी दररोज आत्महत्या करीत आहे; पण राज्यातील सरकार आपल्याच मस्तीत वागत आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी एकनाथ शिंदे (Eknath shinde) सरकारवर केली. (Shinde-Fadnavis government's neglect of farmers' issues: Nana Patole)

विधीमंडळ परिसरात प्रसार माध्यमांशी नाना पटोले बोलत होते, त्यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज आहे; परंतु एकनाथ शिंदे- फडणवीस सरकार मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे. शेतकऱ्यांसाठी केवळ मदत जाहीर केली तीसुद्धा तुटपुंजी आहे. सुमारे २५ हजार कोटी रुपयांच्या पुरवण्या मागण्या सादर करण्यास आल्या. पण, त्यात शेतकऱ्यांसाठी दमडीची तरदूत नाही, हे दुर्दैवी आहे. या सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे.

Nana Patole
'शिवसेनेला कुणबी सेनेची हाय लागलीय'

अतिवृष्टीमुळे गावे उद्ध्वस्त झाली आहेत. शेतीमालाचे प्रचंड नुकसान झाले, जनावरे वाहून गेली आहेत. अशी परिस्थितीत ओला दुष्का जाहीर करून शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याची गरज आहे. पण, राज्य सरकारला शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे वाटत नाहीत. शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजार रुपये कोरवाहूसाठी, तर बागायती तसेच फळबागासाठी हेक्टरी १.५ लाख रुपये दिले पाहिजेत, या मागणीवर आम्ही ठाम आहोत, असेही पटोले यांनी स्पष्ट केले.

Nana Patole
बंगल्यांचे वाटप : विखे-पाटलांना रॉयलस्टोन, राठोड मुख्यमंत्र्यांचे शेजारी, बहुचर्चित रामटेक केसरकरांच्या वाट्याला!

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले म्हणाले की, रायगडच्या समुद्रात शस्त्रात असलेली एक बेवारस बोट सापडली, तर ट्रॅफिक हवालदाराच्या व्हॉट्स ॲपवर मुंबईवर हल्ला करणारा मेसेज येतो, हे गंभीर आहे. मुंबई शहर हे संवेदनशील शहर आहे. पण हे प्रकार समोर आल्याने मुंबईच्या सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. राज्य सरकारने या प्रमुख विषयांवर लक्ष देण्याची गरज आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com