Shinde-Fadanvis-Pawar Politics : शिंदे-फडणवीस-पवार सरकार अलर्ट मोडवर; उद्या महत्त्वाची बैठक

Maharashtra Politics : इंडिया आघाडीतील प्रमुख नेतेमंडळी उद्या मुंबईत येत असताना दुसरीकडे राज्य सरकारमधील शिंदे-फडणवीस आणि पवार यांचीही बैठक हणार आहे.
Shinde-Fadanvis-Pawar Politics :
Shinde-Fadanvis-Pawar Politics :Sarkarama

Mumbai Politics : आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षांकडून केली जात आहे. निवडणुका जशा जशा जवळ येथील तशी सर्वच पक्षाकडून जोरदार तयारी केली जात आहे. एकीकडे महाविकास आघाडीतील घटक पक्षाची बैठक ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबरला मुंबईत होत आहे तर दुसरीकडे महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या भाजप व शिवसेना एकनाथ शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची बैठक ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबरला मुंबईत होत आहे. या बैठकीत लोकसभा निवडणुकीचा आढावा घेत पुढील रणनीती ठरविण्यात येणार असल्याचे समजते.

इंडियाच्या घटक पक्षाची बेंगळुरूत दुसरी बैठक पार पडली याचवेळी एनडीएच्या घटक पक्षाची बैठक दिल्लीत आयोजित करण्यात आली होती. त्याच धर्तीवर इंडियाची मुंबईत बैठक हॊत असताना केवळ विरोधी पक्षांना माध्यमातून जास्त स्थान मिळू नये या उद्देशाने एनडीएच्या घटक पक्षाची बैठक आयोजित करण्यात अली असल्याचे समजते. या बाबतची माहिती भाजपचे आमदार प्रसाद लाड, उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली

Shinde-Fadanvis-Pawar Politics :
Ambadas Danve News : भाजपने बहीण-भावामध्ये फूट पाडली ; राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीवर अंबादास दानवेंचा गंभीर आरोप

आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीचा आढावा या बठकीत घेतला वाजणार असुन या बैठकीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, माजी मंत्री प्रफ्फुल पटेल, सुनील तटकरे, रामदास कदम, गजानन कीर्तिकर उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या बैठकीत काय रणनीती ठरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यासोबतच राज्यातील सर्वच महायुतीचे आमदार व मंत्री यांना ३१ ऑगस्टला मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थनी स्नेहभोजन आयोजित करण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com