PM मोदींचा 'ड्रीम प्रोजेक्ट' बुलेट ट्रेनला शिंदे सरकारकडून गती ; निविदा मागवल्या

bullet train : अरबी समुद्राच्या तळात बोगदा उभारून त्यात बुलेट ट्रेनचा मार्ग तयार करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Narendra Modi, Eknath Shinde
Narendra Modi, Eknath Shindesarkarnama
Published on
Updated on

मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला (bullet train) राज्य सरकारच्या आवश्यक सर्व मंजुरी तातडीने देण्याचा निर्णय यापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाला गती देण्याच्या सूचना केल्याचं समजतं. जपान सरकारच्या सहकार्यानं या प्रकल्पाचं काम केलं जात असून या प्रकल्पासाठी महाराष्ट्र, गुजरात आणि केंद्र सरकार अर्थसहाय्य करत आहे. (bullet train latest news)

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन या प्रकल्पांतर्गत वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स आणि शिळफाटातल्या भूमिगत स्थानकादरम्यान हे काम केलं जाणार आहे. त्यामुळं आता नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉरपोरेशन लिमिटेडनं या कामासाठी निविदा काढल्या आहेत. लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे.

सध्या मुंबई आणि अहमदाबाद या दोन शहरांना जोडणाऱ्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचं काम सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. अरबी समुद्राच्या तळात बोगदा उभारून त्यात बुलेट ट्रेनचा मार्ग तयार करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे भाजप आणि मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती येत असल्याचे चित्र आहे.

Narendra Modi, Eknath Shinde
Dasara Melava : टोमणे,शिव्याच असतील तर मेळाव्याला काय अर्थ ? ; बाळासाहेबांचे विचार राज ठाकरेंच मांडतात..

शिंदे सरकारने बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम रुळांवर आणण्यासाठी नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनने (एनएचआरसीएल) वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) भुयारी बुलेट टर्मिनससाठी निविदा मागवल्या आहेत.

आघाडी सरकार असताना नोव्हेंबर २०१९मध्ये 'एनएचआरसीएल'ने निविदा मागवल्या होत्या. मात्र, बीकेसीतील प्रस्तावित जागेत करोना केंद्र असल्याने संबंधित जागा 'एनएचआरसीएल'ला मिळू शकली नव्हती. यामुळे निविदा रद्द करण्यात आल्या होत्या.

  • अरबी समुद्रात एकूण सात किलोमीटरचा अंडरवॉटर बोगदा तयार करण्यात येईल.

  • देशात पहिल्यांदाच सुरू होत असलेली बुलेट ट्रेन समुद्राखालून धावणार आहे.

  • 'न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड' आणि टनेल बोरिंग मशीनचा वापर करून पाण्याखालील बोगद्याचं काम केलं जाणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com