शिंदे-फडणवीसांनी नार्वेकरांची सुरक्षा वाढवली ; ठाकरे कुटुंबियांसह शरद पवार, आव्हाडांची सुरक्षा कायम

Shinde Government : ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर वरुण सरदेसाई यांना सुरक्षा देण्यात आली होती, ही सुरक्षा आता शिंदे-फडणवीस सरकारने काढून घेतली आहे.
shinde govt cuts security of mavia leaders
shinde govt cuts security of mavia leaderssarkarnama
Published on
Updated on

Shinde Government : महाविकास आघाडीमधील महत्वाच्या नेत्यांच्या सुरक्षेत सुरक्षेत शिंदे -फडणवीस सरकारने शनिवारी कपात केली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांच्या सुरक्षेत मात्र वाढ करण्यात आली आहे.

ज्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे त्यामध्ये अजित पवार, दिलीप वळसे पाटील, वरुण सरदेसाई, बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, नाना पटोले, नितीन राऊत, विजय वडेट्टीवार, धनंजय मुंडे, नवाब मलिक, भास्कर जाधव, नरहरी झिरवळ, सुनिल केदारे, डेलकर कुटुंबीय, जयंत पाटील, संजय राऊत, सतेज पाटील आदी २७ जणांना समावेश आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे स्वीय सहायक राहिलेले मिलिंद नार्वेकर यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. आता ती वाय प्लस एस्कॉर्ट अशी करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांची सुरक्षा कायम ठेवण्यात आली आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांच्या कुटुंबियासाठी असलेल्या सुरक्षेत कोणतीही कपात करण्यात आलेली नाही, राजकारणाशी फारसा संबंध नसणारे उद्धव ठाकरे यांचे लहान चिरंजीव तेजस ठाकरे यांना असणाऱ्या सुरक्षेत कुठलीही कपात करण्यात आलेली नाही, तसेच उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या सुरक्षेतही कपात करण्यात आलेली नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर वरुण सरदेसाई यांना सुरक्षा देण्यात आली होती, ही सुरक्षा आता शिंदे-फडणवीस सरकारने काढून घेतली आहे.

shinde govt cuts security of mavia leaders
Sachin Sawant : मोदींमुळे पोलीस दलांची ओळख पुसणार ; एकाच प्रकारचा गणवेश लोकशाहीसाठी घातक !

सध्या कारागृहात असेलेले शिवसेना नेते संजय राऊत, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि माजी गृहराज्यमंत्री अनिल देशमुख यांची सुरक्षा काढण्यात आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सुरक्षेत कोणताही बदल केलेला नाही.

नार्वेकरांच्या सुरक्षेत वाढ का ?

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत मिलिंद नार्वेकर उमेदवार म्हणून होते. त्यावेळी आशिष शेलार, शरद पवार यांनी सुद्धा नार्वेकरांना मदत केली होती. परंतु ठाकरे कुटुंबातील तीन मते नार्वेकरांना मिळू शकली नाहीत, त्यामुळेच मिलींद नार्वेकर नाराज असल्याच्या चर्चा सुद्धा सुरु होत्या. त्यामुळेच मिलिंद नार्वेकर यांच्या सुरक्षेत शिंदे – फडणवीस सरकरने वाढ केली आहे का ? अशी चर्चा सुद्धा राजकीय वर्तुळात रंगत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com