सुटकेनंतर पहिल्यांदाच शिल्पाचा पती राज कुंद्रानं मौन सोडलं अन् म्हणाला...

अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिचा पती राज कुंद्रा (Raj Kundra) याला मुंबई पोलिसांनी अटक केली होती.
Raj Kundra and Shilpa Shetty 

Raj Kundra and Shilpa Shetty 

Sarkarnama

Published on
Updated on

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिचा पती राज कुंद्रा (Raj Kundra) याला मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अटक केली होती. पॉर्न फिल्मची निर्मिती आणि वितरण केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली होती. कुंद्रा याला न्यायालयाने जामीन मंजूर करण्यात आल्यानंतर अखेर त्याची दोन महिन्यांनंतर काराग़हातून सुटका झाली होती. आता पहिल्यांदाच या प्रकरणी राज कुंद्राने या मौन सोडलं आहे.

कुंद्रा (वय 45) याला पॉर्न फिल्म रॅकेटप्रकरणी 19 जुलैला अटक झाली आहे. या प्रकरणात एकूण 12 आरोपी आहेत. अश्लील चित्रपटांची निर्मिती करुन त्यांचे वितरण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. कुंद्रा याला सुरवातीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. नंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार कुंद्रा असल्याचा दावा मुंबई पोलिसांनी केला आहे. पोलिसांनी कुंद्राकडून 48 टीबी डेटा जप्त केला असून, यात अश्लील फोटो, व्हिडीओंचा समावेश आहे.

आता राजने या प्रकरणात त्याला झालेला त्रास उघडणपणे बोलून दाखवला आहे. तो म्हणाला की, मी पॉर्न फिल्मची निर्मिती आणि वितरण यात सहभागी नव्हतो. माझ्या विरोधात दिशाभूल करणाऱ्या आणि बेजबाबदारपणाच्या बातम्या देण्यात आल्या. हा सर्व प्रकार म्हणजे केवळ मला लक्ष्य करण्याचा होता. मी आता या प्रकरणी खटल्याला सामोरा जाण्यास तयार आहे. मला कुटुंब आणि माध्यमांनी आधीच दोषी ठरवलं आहे. माझ्या मानवी आणि घटनात्मक हक्कांचा भंग करण्यात आला असून, यामुळे मला खूप वेदना झाल्या आहेत.

<div class="paragraphs"><p>Raj Kundra and Shilpa Shetty&nbsp;</p></div>
मोदी सरकार झुकलं! आणखी एक मोठा निर्णय मागे घेण्याच्या तयारीत

मी आता माझ्या चेहरा शरमेने झाकणार नाही तर मी उजळ माथ्याने वावरणार आहे. माझ्या खासगीपणावर अतिक्रमण होणार नाही, अशी मला आशा आहे. माझ्या विरोधातील मीडिया ट्रायलही थांबेल, अशी अपेक्षा मला आहे. माझे प्राधान्य नेहमी कुटुंबाला राहिले आहे. सन्मानाने जगण्याचा हक्क प्रत्येकाला असून, तो कुणीही नाकारू शकत नाहीत, असे कुंद्राने स्पष्ट केले.

<div class="paragraphs"><p>Raj Kundra and Shilpa Shetty&nbsp;</p></div>
एनसीबीला वानखेडेंचा रामराम; कार्यकाळ 31 डिसेंबरला अखेर संपणार

या प्रकरणात मुंबई पोलिसांनी १ हजार ४०० पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. यानंतर त्याने जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. या प्रकरणात आरोपपत्र दाखल झाले असून, तपासही पूर्ण झाला आहे, त्यामुळे जामीन मिळावा, अशी विनंती त्याने न्यायालयाकडे केली होती. अखेर न्यायालयाने त्याला जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला होता. त्यामुळे तब्बल दोन महिन्यांनी तो कारागृहातून सुटला होता. कारागृहातून बाहेर आल्यानंतर भावनिक झालेल्या राजला अश्रू आवरता आले नव्हते. तो माध्यमांशी काहीही न बोलता तेथून निघून गेला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com