Shishir Shinde News: कट्टर शिवसैनिक, राज ठाकरेंचे निकटवर्तीय ; कोण आहेत शिशिर शिंदे..

Shishir Shinde Political Journey: राज ठाकरे यांच्या सोबत शिवसेनेतून काही नेते बाहेर पडले. यात शिशिर शिंदे हेही होते.
shishir shinde
shishir shindeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: शिवसेना वर्धापनदिनाच्या पूर्वसंध्येला ठाकरे गटाचे उपनेता शिशिर शिंदे यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिली आहे. एकेकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून शिशिर शिंदे ओळखले जायचे. त्या शिशिर शिंदेंचा राजकीय प्रवास जाणून घेऊया...

Shishir Shinde News
Shishir Shinde News Sarkarnama

उद्धव ठाकरे भेटीसाठी वेळ देत नसल्याचंही शिशिर शिेंदे यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटलं आहे. आयुष्यातली चार वर्षे वाया गेली असे त्यांनी या पत्रात म्हटलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राज्यव्यापी शिबीर मुंबईत रविवारी झाले. त्यापूर्वीच शिशिर शिंदे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्याकडे राजानामा सुपूर्त केला.

मूळचे कट्टर शिवसैनिक म्हणून शिशिर शिंदे यांची ओळख होती. 2005 मध्ये राज ठाकरे यांनी शिवसेना सोडून नवीन पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला तेव्हा राज ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेतून काही नेते बाहेर पडले. यात शिशिर शिंदे हेही होते.

Shishir Shinde News
Shishir Shinde News Sarkarnama

मनसेची स्थापना झाल्यानंतर 2009 मध्ये शिशिर शिंदे भांडुप विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. शिशिर शिंदे हे तेरा वर्ष मनसेमध्ये सक्रिय होते. २०१४ मधील विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. २०१८ मध्ये त्यांनी राज ठाकरेंची साथ सोडली. मनसेत बराच काळ राहिल्यानंतर त्यांनी पक्षांतराचा निर्णय घेतला.

shishir shinde
Shishir Shinde resign : मनासारखं काम मिळत नसल्याने शिशिर शिंदेंचा ठाकरे गटाला 'जय महाराष्ट्र' ; वर्धापनदिनाच्या पूर्वसंध्येला..

शिशिर शिंदे यांची 19 जून 2018 मध्येशिवसेनेत घरवापसी झाली. त्यानंतर बराच काळ सक्रिय नव्हते. 2022 पर्यंत त्यांच्यावर पक्षाने कोणतीही जबाबदारी दिली नाही. एकनाथ शिंदेंसह 40 आमदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर म्हणजे जून 2022 मध्ये त्यांचं शिवसेनेत पुनर्वसन करण्यात आलं. ठाकरे गटाकडून त्यांना उपनेता करण्यात आले होते.

1991 मध्ये पाकिस्तानसोबत क्रिकेट सामने खेळवण्यास शिवसेनेने विरोध केला होता.त्यावेळी शिशिर शिंदे आणि इतर काही शिवसैनिकांनी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवरील खेळपट्टीच खोदली होती.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com