धनुष्यबाण शिंदे गटाकडे गेल्यास शिवसैनिक रस्त्यावर उतरेल...युवासेनेचा इशारा

Shivsena : राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल...
Sharad Koli Latest News
Sharad Koli Latest News Sarkarnama

Shivsena : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यापासून शिवसेना (Shivsena) आणि बंडखोरी केलेल्या शिंदे गटाची लढाई आता कायदेशीर झाली असून याबाबतची सुनावणी न्यायालयात प्रलंबित असून पक्ष चिन्ह कुणाच हे ठरवण्याचा अधिकार हा निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाने देत शिंदे गटाला दिलासा दिला आहे.

यामुळे आयोगाने धनुष्यबाण हे पक्षचिन्ह जर शिंदे गटाला दिले, तर शिवसैनिक रस्त्यावर उतरेल यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकेल,असा गंभीर इशारा युवासेनेकडून युवासेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांनी दिला आहे. (Sharad Koli Latest News )

Sharad Koli Latest News
'आम्ही विचारांचे वारसदार' : शिंदे गटाकडून दसरा मेळाव्याचे पहिले पोस्टर जाहीर

कोळी यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यापासूनच ते सातत्याने शिंदे गटावर टीका करत आहेत. दरम्यान निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देईल, असा गौप्यस्फोट शिंदे गटाचे नेते आणि मंत्री अब्दुल सत्तार यांनी केल्यावर राज्यत एकच खळबळ उडाली आहे. यानंतर कोळी आक्रमक झाले असून, असे झाल्यास शिवसैनिक रस्त्यावर उतरेल. दंगलही होऊ शकेल त्यामुळे राज्यभरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असा इशारा त्यांच्याकडून देण्यात आला आहे.

कोळी यांनी मंत्री सत्तारांवर जोरदार टीका केली ते म्हणाले की, सत्तार म्हणजे उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग आहेत. शिवसेनाचे धनुष्यबाण चिन्ह देण्याची जबाबदारी ही सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगावर टाकली आहे. मात्र आयोगाने जर पक्षपातीपणा करत निर्णय दिला अथवा शिंदे गट आणि निवडणूक आयोगांनी '५० खोके एकदम ओके' कार्यक्रम केला, तर शिवसैनिक रस्त्यावर उतरतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Sharad Koli Latest News
मंत्री सावंतांचे चार वाद...खेकडा, हाफकिन, डास, आणि आता खाज...

दरम्यान, मंत्री तानाजी सावंतांच्या विधानावरही कोळींनी त्यांना सडेतोड उत्तर दिले होते. आता त्यांनी पुन्हा शिंदे गटाला आव्हान दिले आहे. यावर शिंदे गटाची काय प्रतिक्रिया येते हे बघावे लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com