तर भाजपास समर्थ पर्याय देण्याच्या बाता कोणी करू नयेत...

कॉंग्रेस (Congress) वगळून देशात विरोधी पक्षांच्या तिसऱ्या आघाडीच्या नेतृत्वावरुन सुरू असलेल्या वादावर शिवसेनेने (Shivsena) तोंडसुख घेतलं आहे.
Shivsena- CM Uddhav Thackeray
Shivsena- CM Uddhav Thackeray

मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banarjee) यांच्या मुंबई दौऱ्यानंतर राष्ट्रीय स्तरावर भाजपविरोधी आघाडी उभारण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीही त्याला दुजोरा दिल्यामुळे या घडामोडींना वेग आल्याचेही दिसून येत आहे. मात्र, विरोधकांच्या आघाडीच्या नेतृत्वावरुन सुरू असलेल्या वादावर शिवसेनेने (Shivsena) तोंडसुख घेतलं आहे.

दैनिक सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेने भाजपविरोधी तिसऱ्या आघाडीच्या घडामोडींवर निशाणा साधला आहे. ''भारतीय जनता पक्षासमोर समर्थ पर्याय उभा करायला हवा यावर एकमत आहेच, पण कोणी कोणाला बरोबर घ्यायचे किंवा वगळायचे यावर विरोधकांत अखंड खल सुरू आहे. विरोधकांतच ऐक्याचा किमान समान कार्यक्रम तयार होणार नसेल तर भाजपास समर्थ पर्याय देण्याच्या बाता कोणी करू नयेत,'' अशा सडेतोड शब्दांत शिवसेनेने आक्षेप घेतला आहे.

Shivsena- CM Uddhav Thackeray
अविनाश बागवे यांचे नगरसेवक पद रद्द

तसेच, “देशात काँग्रेसच्या (Congress) नेतृत्वाखालील ‘यूपीए’ आहेच कुठे? हा सवाल मुंबईत येऊन ममता बॅनर्जी यांनी विचारला. तो प्रश्नच सध्याच्या स्थितीत लाखमोलाचा आहे. यूपीए अस्तित्वात नाही तसा एनडीएही नाही. मोदी यांच्या पक्षाला आज एनडीएची गरज नाही, पण विरोधकांना यूपीएची गरज आहे. यूपीए समांतर दुसरी आघाडी स्थापन करणे हे भाजपचे हात बळकट करण्यासारखेच आहे. ”, अशा शब्दांत शिवसेनेनं निशाणा साधला आहे.

तसेच, “काँग्रेसला विरोधी पक्षांचे नेतृत्व करण्याचा दैवी अधिकार प्राप्त झालेला नाही, असं ऐतिहासिक विधान तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते प्रशांत किशोर करतात. दैवी अधिकार कुणालाच प्राप्त होत नाही. यूपीए नेतृत्वाचा दैवी अधिकार कुणाचा ते येणारा काळच ठरवेल. आधी पर्याय तर उभा करा”, अशा शब्दांत शिवसेनेने विरोधी पक्षांना सुनावले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com