'जलील यांच्या सांत्वनासाठी पंकजा गेल्या...पण जानकरांना का विसरल्या?'

इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांच्या प्रस्तावामुळे राज्यातील राजकारण तापले आहे.
Pankaja Munde, Manisha Kayande
Pankaja Munde, Manisha Kayandesarkarnama

मुंबई : एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्यासोबत झालेल्या सांत्वनपर भेटीत महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) सहभागी होण्याचा प्रस्ताव दिला. या प्रस्तावामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. त्यावरुन राज्यात आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण रंगले असतानाच आता शिवसेनेच्या (Shivsena) नेत्या मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांनी भाजप (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यावर निशाणा साधला आहे.

पंकजा मुंडे यांनी इम्तियाज जलील यांच्या निवासस्थानी जात त्यांची भेट घेतली होती. एवढे नव्हे तर दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली होती. त्यामुळे या भेटीत काय चर्चा झाली, असा सवाल उपस्थित केला जात आहे. या भेटीवरुनही आता राजकारण रंगले आहे. मनिषा कायंदे यांनी या संदर्भात ट्वीट करत पंकजा यांना काही सवाल विचारले आहेत. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की "जनाब इम्तियाज जलील यांच्या मातोश्रींचे दुःखद निधन झाल्यावर पंकजा मुंडे यांनी त्यांची भेट घेतली. ते ठीकच आहे. परंतु ज्यांनी बहीण मानली त्या महादेव जानकर यांच्या मातोश्रीचे दुःखद निधन झाल्यावर पंकजा यांना वेळ का मिळाला नाही, याचे उत्तर आज समजते'' असा टोला कायंदे यांनी मुंडे यांना लगावला आहे.

Pankaja Munde, Manisha Kayande
एमआयएम कुणासोबत गेली तरी भाजप स्वबळावर लढणार आणि जिंकणारही..

दरम्यान, राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर (Mahadev Jankar) यांच्या आईचे निधन ३१ मार्च २०२१ ला झाले. पंकजा मुंडे यांनी जानकर यांना बंधू मानले आहे. या दोघांच्या बंधुप्रेमाची चर्चा अनेक वेळा ऐकायला मिळते. मात्र, जानकर यांच्या आईचे निधन झाल्यानंतर त्यांचे सांत्वन करण्यासाठी काही कारणामुळे पंकजा गेल्या नव्हत्या. त्यामुळे रासपच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला होता. मात्र, जानकर यांची भेट न घेणाऱ्या पंकजा यांनी जलील यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यावरुनच कायंदे यांनी पंकजा यांच्यावर निशाणा साधला आहे.

Pankaja Munde, Manisha Kayande
दहशतवाद्यांची वकिली करणाऱ्या ओवेसींच्या एमआयएमसोबत कधीच जाणार नाही..

इम्तियाज यांच्या भेटीनंतर टोपे काय म्हणाले होते, इम्तियाज जलील आणि मी अगदी पहिली ते दहावीपर्यंत एकत्र शिकलो आहे. बालपणीचे आम्ही मित्र आहोत, नंतर ते राजकारणात आले, आमदार आणि आता खासदार, एका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. नुकतेच त्यांच्या आईचे दुःखद निधन झाले. त्यामुळे त्यांचे सांत्वन करण्यासाठी ही भेट घेतली. कौटुंबिक विषय झाल्यानंतर सहाजिकच राज्य आणि देशातील राजकारणावर अनौपचारिक चर्चा झाली. यात तुमच्यामुळे भाजपला फायदा होतो, उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत तुमच्यामुळे भाजपच्या जागा निवडून आल्या हा विषय निघाला. एमआयएमच्या उमेदवारामुळे भाजप विरोधी आघाडीचे १० ते १५ उमेदवार हे अगदी थोड्या मतांनी पराभूत झाले. यावर इम्तियाज यांची भूमिका अशी होती की, मुस्लिम व इतर अल्पसंख्याक समाजाचा विकास करणे, त्यांची आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक परिस्थिती सुधारून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे आमच्या पक्षाचे प्रयत्न सुरू आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com