सगळीच येड्यांची जत्रा; चंद्रकांतदादांच्या आव्हानाची राऊतांनी काढली हवा

उत्पल पर्रिकर यांच्या उमेदवारीवरून चंद्रकांत पाटील यांनी राऊतांना आव्हान दिलं आहे.
Chandrakant Patil-Sanjay Raut
Chandrakant Patil-Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : गोवा विधानसभा निवडणुकीत (Goa Election 2022) उत्पल पर्रीकर यांना पाठिंब्याची चर्चा करण्यापेक्षा हिंमत असेल तर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी स्वत: गोवा विधानसभा निवडणुकीला उभे राहावे, असे आव्हान भाजपेच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिले होते. त्यावर राऊतांनी पलटवार करत सगळीच येड्यांची जत्रा अशी टीका केली आहे. तसेच राऊतांनी ट्विट करत चंद्रकांतदादांना निवडणुकीबाबत माहितीही दिली आहे.

गोवा विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर (Manohar Parikar) यांचे चिरंजीव उत्पल पर्रीकर (Utpal Parikar) यांनी उभे राहावे, शिवसेना (Shiv Sena) त्यांना पाठिंबा देईल, असे विधान खासदार राऊत यांनी केले होते. त्यावर बोलताना पाटील यांनी सोमवारी खासदार राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. महाराष्ट्रात बसून पर्रीकर यांना पाठिंब्याची भाषा करणे सोपे आहे. प्रत्यक्षात तिकडे यांना कोण विचारतो. मुंबईत राहून अशा गप्पा मारण्यापेक्षा खासदार राऊत यांनी गोव्यात जाऊन एखाद्या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) गुजरातमधून जाऊन उत्तर प्रदेशात निवडणूक लढवतात तसे धाडस खासदार राऊत यांनी दाखवावे, असं आव्हान पाटील यांनी दिलं होतं.

Chandrakant Patil-Sanjay Raut
Video : भाषणादरम्यान टेलिप्रॉम्प्टर बंद पडताच पंतप्रधान मोदींची उडाली तारांबळ

पाटील यांच्या या आव्हानावर राऊतांनी ट्विट केलं आहे. 'सगळीच येड्यांची जत्रा : संजय राऊत यांनी गोव्यात जाऊन निवडणूक लढवावी. इति चंद्रकांत पाटील.. कोणत्याही विधानसभेमध्ये निवडणूक लढवायची असेल तर त्या राज्याच्या मतदार यादीत मध्ये नाव असणे गरजेचे असते, एवढे भाजप नेत्यांना माहिती नाही, याचे आश्चर्य वाटते. ईश्वर त्यांना सुबुद्धी देवो,' असं राऊतांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, मंगळवारी माध्यमांशी बोलताना राऊतांनी पुन्हा एकदा भाजपवर टीकास्त्र सोडला. भाजपचे नेते मनोहर पर्रिकरांच्या मुलाचा अपमान करत आहेत. आम्ही जेव्हा म्हटलं की, उत्पल पर्रिकर अपक्ष उभे राहिले तर आम्ही मदत करू. त्यानंतर त्यांची धावपळ सुरू झाली. मी राजकीय बोलत नाही. गोव्यात भाजप जे दिसत आहे, ते मनोहर पर्रिकर यांच्यामुळे ओळखली जाते, असे राऊत म्हणाले.

ज्या विधानसभा मतदारसंघाचे मनोहर पर्रिकर यांनी प्रतिनिधित्व केलं, त्या मतदारसंघात एका माफियाला तिकीट दिलं जात असल्याचे ट्विट उत्पल पर्रिकर यांनी केलं होतं. त्यांना उमेदवारी द्यावीच लागेल. एखाद्या नेत्याविषी, कुटुंबाबद्दल सहानुभूती असते. ही महाराष्ट्राची परंपरा आहे. गोव्यातही ही परंपरा असावी. त्यामुळे माझ्या भुमिकेला अनेकांनी पाठिंबा दिला आहे, असंही राऊतांनी स्पष्ट केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com