फडणवीसांनी गाजर वाटले, आम्ही चाव्या वाटतोय ; ठाकरेंचा हल्लाबोल

आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले, ''शिवसेनेचा Shivsena आवाज कोणी दाबू शकत नाही. इतर पक्ष चावी मारण्याचं काम करत असतं आपण चावी वाटण्याचे काम करत आहोत शिवाय शब्द दिलेला असतो तो पाळायचा असतो शब्दाचा वाटप होऊ शकत नाही,''
Aditya Thackeray, Devendra Fadnavis
Aditya Thackeray, Devendra Fadnavissarkarnama
Published on
Updated on

मुंबई : ''मुंबई महापालिका निवडणुका जवळ आल्या आहेत त्या येतील आणि जातील त्यावर आपला भगवा फडकत राहिल, महापालिकेत शिवसेनेची सत्ता स्वबळावर आणायची आहे,'' असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.

मुंबईतील विक्रोळीमधील संक्रमण शिबिरामध्ये राहणाऱ्या 411 कुटुंबियांच्या नवीन घरांच्या लोकार्पणाचा कार्यक्रम नुकताच झाला. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) उपस्थित होते. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी मागील पाच वर्षात राज्यातील सरकार सांभाळणाऱ्या देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavisयांच्यावर घणाघाती टीका केली आहे. मागील सरकारने पाच वर्षात फक्त गाजर वाटपाचा कार्यक्रम केला आहे. मात्र, आम्ही तुम्हाला चावी वाटपाचा कार्यक्रम करत आहोत, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले, ''शिवसेनेचा Shivsena आवाज कोणी दाबू शकत नाही. देशातलं पण वातावरण बदलायचा आहे राजकीय वातावरण बदलाच आहे. इतर पक्ष चावी मारण्याचं काम करत असतं आपण चावी वाटण्याचे काम करत आहोत शिवाय शब्द दिलेला असतो तो पाळायचा असतो शब्दाचा वाटप होऊ शकत नाही,''

Aditya Thackeray, Devendra Fadnavis
कॉग्रेसची मोठी घोषणा ; प्रदेश कार्यकारिणीची संख्या अडीचशेवर जाणार

राऊत म्हणाले, ''शिवसेना काय करते असं विरोधी पक्ष Opposition Party नेहमी बोलत आहेत याचं एक चावी विरोधी पक्षांना दिली पाहिजे महाराष्ट्रमध्ये काम करण्याची चावी आपल्या मुख्यमंत्र्यांकडे आहे. देशामध्ये 32 राज्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री Maharashtra CM कामाच्या बाबतीत पहिल्या पाचमध्ये आले आहेत तसंच सेनेचे मुख्यमंत्री झाल्यापासून कुणाच्या पोटात जळजळ मळमळ होत असेल तर ते होऊ दे त्याला इलाज नाही.''

''बाकी बंद करा भगवा झेंडा खांद्यावर घेऊन बाळासाहेबांच्या विचारांच्या दृष्टीने मार्गदर्शन होणार आहे, आपण आलात तेव्हा पाऊस थांबला कालपासून पाऊस पाऊस येतो पाहून जातो

शिवसेनेची लाट कायम असते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे कामाच्या बाबतीत पहिल्या पाचमध्ये पहिले आहे राजकारणात समाजकारण आहे. शिवसेनाप्रमुख सांगून गेले मानवता हाच खरा धर्म आहे, '' असे राऊत म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com