Aaditya Thackeray Pegasus : 'सरकारकडून हेरगिरी!' ठाकरेंकडून 'पेगासस स्पायवेअर'चा उल्लेखानं खळबळ

Aaditya Thackeray Raises Pegasus Spyware Issue in Assembly, Slams BJP Mahayuti : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नसल्याने भाजप महायुती सरकारवर शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंचा जोरदार टीका.
Aaditya Thackeray Pegasus
Aaditya Thackeray PegasusSarkarnama
Published on
Updated on

Aaditya Thackeray BJP criticism : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रशासक राजवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे युवासेना प्रमुख तथा आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजप महायुती सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

"स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नसल्याने सर्वसामान्यांशी निगडीत असलेले प्रश्न कसे रेंगाळले आहेत. नागरिकांच्या किती तक्रारी येतात, हे पाहण्यासाठी आमचे मोबाईल पाहावा, कदाचित 'पेगासस'च्या माध्यमातून पाहात देखील असाल", असा टोला आदित्य ठाकरे यांनी भाजप महायुती सरकारला लगावला.

आमदार आदित्य ठाकरे यांनी विधिमंडळात एक तास तुफान भाषण केलं. यात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रेंगाळलेल्यावर भाजप (BJP) महायुती सरकाराच्या कारभारावर जोरदार हल्ला चढवला. ठाकरे यांच्या मदतीला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आमदार भास्कर जाधव देखील होते. आदित्य ठाकरेंनी भाजप सरकारच्या कारभारावर टीका करताना, शेरोशायरीचा देखील आधार घेतला.

आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) म्हणाले, "स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये गेल्या तीन-साडेतीन वर्षांपासून प्रशासक राज, सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये पन्नास टक्के हा शहरी भाग आहे, या शहरी भागामध्ये मोठी लोकसंख्या राहते. अशा शहरांचा कारभार प्रशासकामार्फत चालवताना तो नेमका कोणाकडून चालवला जात असल्याचे हे लोकांना समजायला तयार नाही".

Aaditya Thackeray Pegasus
Ahilyanagar Zilla Parishad Election : 'झेडपी' निवडणुकीचे पडघम; अहिल्यानगर गट अन् गणाचा प्रारूप आराखडा जाहीर, दिग्गजांच्या बालेकिल्ल्यात उलथापालथी

'महापौर आणि नगरसेवक नाहीत. मंत्री, आमदार, खासदार यांच्याकडे जायचं की अन्य कोणाकडे जायचं? नगरसेवक नसल्याने गटार, वॉटर, मीटर हे प्रश्न सोडवायचे कोणी? वेगवेगळ्या शहरांमध्ये प्रशासनाची कारभाराची वेगवेगळी पद्धत आहे. त्यामुळे अधिकच गोंधळ उडतो आहे. अनेक कामांची टेंडर, अशी काढली जातात की कुठेतरी गफलत केलेलीच असते. सत्ताधारी आणि विरोधक यांच्याकडे देखील या गडबडीचे उत्तर नसते', असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.

Aaditya Thackeray Pegasus
Nilesh Rane : आदित्य ठाकरेंच्या एका वाक्यावर निलेश राणेंचा पारा चढला; अधिवेशनातच हिंमत दाखवण्याचे केले आव्हान

प्रशासनाला सर्वसामान्यांचे काहीच पडलेलेच नाही. अधिकारी आपापल्या सहीवर कारभार चालवतात, आपलं मंडळ बनवलेला आहे. ही परिस्थिती सांगताना आदित्य ठाकरे यांनी 'शेरोशायरी' केली. "लगाकर आग शहर को. ये बादशाह ने कहा. 'उठा है आज दिल में तमाशे का शौक बहुत, झुका के सर सभी बोल उठे कि. हुजूर का शौक सलामत रहे, शहर और भी बहुत है।", असा टोला भाजप महायुतीला आदित्य ठाकरे यांनी लगावला.

'मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, वसई-विरार, सोलापूर प्रत्येक शहरांमध्ये प्रशासक बसवले आहे. इथं सत्ताधारी आणि विरोधकांचं अजिबात ऐकलं जात नाही. आम्ही आमदार म्हणून कितीही प्रस्ताव टाकले, तरी अधिकाऱ्यांना जिथून आदेश येतात, ज्या दप्तरातून आदेश येतात त्याच्यावरच कार्यवाही करतात. आम्ही जनतेतून निवडून आलेलो आहोत. काहींचा राजकीय प्रवास नगरसेवक पदापासून सुरू झालेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कुठल्याही नगरसेवक, महापौर, उपमहापौर, सभापती अन् कमिटी नाही, मग स्थानिकांनी जायचे कोठे?', असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला.

ठाकरेंकडून 'पेगासस'चा सभागृहात उल्लेख

आदित्य ठाकरेंनी सभागृहातील आमदारांकडे पाहून विधानसभा अध्यक्षकांना, तुम्ही आमच्या सर्वांचे मोबाईल फोन पाहाल, कदाचित 'पेगासस'च्या माध्यमातून पाहात देखील असाल, जनतेच्या शेकडो तक्रारी रोज येतात, मान्सूनपूर्व तयारीत प्रशासन कमी पडले आहे. अनेक कामे झालेलीच नाहीत. मुंबईतील एखादा रस्ता बनवायचे असेल तर 16 एजन्सी आणि रस्त्याखालील कामासाठी 42 एजन्सींची सांगड घालावी लागते. पण तिथं महापौर नाही, विरोधी पक्ष नेता नाही, अशी परिस्थिती आहे. साधा कचरा देखील वेळोवेळी उचलला जात नाही, प्रशासनाकडून मान्सूनपूर्वच्या बैठका देखील झाल्या नाहीत, असा घणाघात केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com