Shiv Sena MLA Disqualification : विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधातील याचिकेवर 'या' दिवशी सुनावणी

Supreme Court : सर्वोच्च न्यायालयात 7 मार्चला या प्रकरणावर सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय या प्रकरणावर काय निर्णय देतं, हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.
Shiv Sena MLA Disqualification Case
Shiv Sena MLA Disqualification CaseSarkarnama

Delhi News: शिवसेनेच्या फुटीनंतर आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल देताना शिंदे गटच खरी शिवसेना पक्ष असल्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला होता. त्याआधी केंद्रीय निवडणूक आयोगानेदेखील शिंदे गटच शिवसेना पक्ष असल्याचा निर्णय दिला. यानंतर विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाला विरोध करत ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. (Shiv Sena MLA Disqualification)

आता या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) 7 मार्चला सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 10 जानेवारीला शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल दिला होता. हा निर्णय देताना विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही गटाचे आमदार पात्र ठरवले होते. मात्र, शिंदे गटच शिवसेना पक्ष असल्याचा निर्णय देत ठाकरेंना धक्का दिला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Shiv Sena MLA Disqualification Case
Manoj Jarange Patil : लोकसभा लढविण्यासाठी जरांगेंवर वाढता दबाव; आंबेडकरांपाठोपाठ स्वाभिमानीचाही पाठिंबा

शिवसेनेत जून 2022 मध्ये उभी फूट पडली. यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) राज्याचे मुख्यमंत्री झाले. तेव्हापासून ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट असा राजकीय संघर्ष सुरू झाला. यानंतर हे प्रकरण केंद्रीय निवडणूक आयोग (Election Commission), सर्वोच्च न्यायालय आणि विधानसभा अध्यक्षांकडे गेले. यानंतर निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला दिले.

यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. या सर्व घडामोडीनंतर ठाकरे गटाकडून या निर्णयाला आव्हान देण्यात आले. आता सर्वोच्च न्यायालयात 7 मार्चला या प्रकरणावर सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय या प्रकरणावर काय निर्णय देतं, हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे. दरम्यान, या प्रकरणाच्या सुनावणीवेळी दोन्ही गटांत पुन्हा एकदा वाद-प्रतिवाद होण्याची शक्यता आहे.

(Edited By-Ganesh Thombare)

R

Shiv Sena MLA Disqualification Case
Congress News : पिक्चर अभी बाकी है! माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी-मुलाने पुन्हा वाढवलं काँग्रेसचं टेन्शन

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com