मुंबईतील आमदार निवासात दुर्घटना; शहाजी पाटील थोडक्यात बचावले

मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासात ही घटना घडल्याचे समोर आले आहे.
Shiv Sena MLA Shahaji Patil Latest News
Shiv Sena MLA Shahaji Patil Latest NewsSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : 'काय झाडी, काय, डोंगार, काय हॉटेल..,' या डायलॉगने जगभर प्रसिध्द झालेले शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील थोडक्यात बचावले आहेत. मुंबईत ते राहत असलेल्या आकाशवाणी आमदार निवासातील पाटील यांच्या खोलीच्या छताचा काही भाग कोसलून दुर्घनटना घडली. यावेळी पाटील हे खोलीतच होते. सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नसल्याचे समजते. (Shiv Sena MLA Shahaji Patil News)

आमदार पाटील सध्या प्रसिध्दीच्या झोतात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत बंड केल्यानंतर त्यांच्या बंडापेक्षा एका डायलॉगने त्यांना प्रसिध्दी मिळाली. त्यानंतर सध्या ते सतत माध्यमांमध्ये झळकत असून सोशल मीडियातही त्यांच्या डायलॉकचे व्हि़डीओ व्हायरल होत आहेत. तसेच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावरही ते सतत तोफ डागताना दिसत आहेत.

Shiv Sena MLA Shahaji Patil Latest News
राऊतसाहेब, आमच्याही मर्यादा आता संपल्यात! भूमरेंनी थेट आव्हानच दिलं

उपलब्ध माहितीनुसार, पाटील यांची मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासात खोली आहे. बुधवारी मध्यरात्री या खोलीच्या छताचा काही भाग कोसळला. यावेळी पाटील हे खोलीतच होते. पण ते सुरक्षित असल्याची माहिती पुढे आली आहे. या घटनेबाबत पाटील यांच्याकडून अद्याप प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

Shiv Sena MLA Shahaji Patil Latest News
भावना गवळींची उचलबांगडी अन् विचारेंना बढती का? राऊतांनीच सांगितलं कारण...

दरम्यान, पाटील यांच्या खोलीतील घटनेचे काही फोटो समोर आले आहेत. या फोटोंवरून ही घटना मोटी असल्याचे स्पष्ट झालं आहे. पाटील या घटनेतून थोडक्यात बचावल्याचे समजते. आमदार निवासातही ही घटना घडल्याने आता आमदारांमध्ये रोष वाढण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com