भेदरलेली शिवसेना ताकही फुंकून पिणार; आमदारांच्या मुक्कामाचे हॉटेल बदलले

विधान परिषदेच्या निवडणुकीत 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात आहेत.
CM Uddhav Thackeray Latest Marathi News
CM Uddhav Thackeray Latest Marathi NewsSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : राज्यसभा निवडणुकीपाठोपाठ विधान परिषदेतही फोडाफोडीच्या शक्यतेने भेदरलेली शिवसेना ताकही फुंकून पिऊ लागली आहे. या निवडणुकीतही आमदारांना डोळ्याआड ठेवायला शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तयारी नसल्याने त्यांना पवईमधील रेनिसन्स हॉटेलमध्ये बंदिस्त केले जाणार आहे. (CM Uddhav Thackeray Latest Marathi News)

सलग तीन दिवस ट्रायडंटमध्ये ठेवूनही विपरितच घडल्याने आता 'रेनिसन्स' चा आधार घेण्यात येणार आहे. पुढच्या तीन-चार दिवसांत आपल्या पुन्हा एकदा बॅगा भरून मुंबईत येण्याचा आदेश धाडला जाणार आहे. त्यानंतर आमदारांना थेट रेनिसन्समध्ये पाठविले जाईल. हॉटेलबाबत आमदारांच्या तक्रारी आल्या तरी त्या आता ऐकून घेतल्या जाणार नसल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे आमदारांना ट्रायडंटऐवजी याच हॉटेलमध्ये मुक्काम ठेवावा लागेल. (Shiv Sena MLAs will stay in Hotel amid MLC Election)

CM Uddhav Thackeray Latest Marathi News
छत्रपतींना माझी विनंती, असं करू नका नाहीतर..! संजय पवारांचा इशारा

राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार संघर्ष झाला. त्यातून दगाफटका नको म्हणून शिवसेनेच्या आमदरांना सहा जूनपासूनच हॉटेलमध्ये बंद करण्यात आले होते. पहिल्यांदा मडमधील रिट्रीटमध्ये ठेवण्यात आले, परंतु, विधान भवनापासून ते खूपच लांब असल्याने आमदारांना पुन्हा तीन दिवस ट्रायडंटमध्ये ठेवले गेले. तरीही, या निवडणुकीत शिवसेनेला दगाबाजीचा फटका बसला आणि संजय पवार हरले आणि भाजपचे धनंजय महाडिक जिंकले.

या निवडणुकीत महाविकास आघाडीला साथ देणाऱ्या ९ आमदारांची मते फुटली. या निकालाने हत्तीचे बळ चढलेल्या भाजपने विधान परिषदेतही फोडाफोडी करून शिवसेनेला धडा शिकविण्याचे जाहीरच केले आहे. त्यातच विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसकडून झाला, परंतु, काँग्रेसने आपला दुसरा उमेदवार कायम ठेवल्याने पुन्हा घोडेबाजाराची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

CM Uddhav Thackeray Latest Marathi News
विद्यार्थ्याला असं तुरुंगात ठेवणं पवारांनाही आवडणार नाही! उच्च न्यायालयाचे खडे बोल

त्यामुळे आतापासून आमदारांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचा निर्णय शिवसेना नेतृत्वाने घेतला आहे. त्यासाठी पुन्हा नव्या हॉटेलचा शोध घेतला असून, ज्यामुळे आमदारांना सहजासहजी कोणी भेटणार नाही आणि त्यांच्यासोबत कोणीही चर्चा करू शकणार नाही, अशी आशा ठाकरेंना आहे. त्यामुळे या खेपेला आमदारांना रेनिसन्समध्ये ठेवून, त्याचठिकाणी बैठका आणि इतर चर्चा करण्याची भूमिका घेतली.

आघाडीच्या नेत्यांच्या एकत्रित बैठका घेण्याची वेळ या निवडणुकीत येणार नाही. त्यामुळे हेच सुरक्षित असेल, असेही सांगण्यात येत आहे. या निवडणुकीसाठी विजयी होण्यासाठी २७ मतांचा कोटा आवश्यक आहे. शिवसेनेचे संख्याबळ पाहता सचिन अहिर आणि आमशा पाडवी हे सहज निवडून येऊ शकतात. परंतु, काँग्रेसने माघार न घेतल्याने निवडणुकीला सोमोरे जावे लागत असलेल्या भाजपकडून शिवसेनेलाही धोका होईल, असे नाही. राज्यातील सत्ता गेल्यापासून भाजप आणि शिवसेनेतून विस्तवही जात नाही. त्यामुळे शिवसेनेला हरविण्याची एकही संधी भाजप नेते सोडणार नाही, याची जाणीव असल्यानेच शिवसेना अलर्ट झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com