Sanjay Raut News : खिचडी घोटाळ्यातील सहभागींना देवगिरी अन् वर्षा बंगल्यावर केटरिंगचे कंत्राट!

ED Notice : कथित खिचडी घोटाळाप्रकरणी ईडीने संदीप राऊतांना नोटीस पाठवली आहे.
Sanjay Raut, Eknath Shinde
Sanjay Raut, Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Dombivali News : खासदार संजय राऊत यांचे बंधू संदीप राऊत यांना कथित खिचडी घोटाळ्यामध्ये ईडीची नोटीस आल्याने चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे. यासंदर्भात बोलताना राऊत यांनी कोरोना काळात खिचडी वाटप करणार असल्याचे सांगून बीएमसीमधून पैसे उकळले आणि खिचडी वाटप केलेच नाही, असे अनेक जण आज भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटात असल्याचा दावा केला आहे. इतकेच नव्हे तर देवगिरी आणि वर्षा बंगल्यावर त्यांचे केटरिंगचे व्यवसाय सुरू असल्याचा गंभीर आरोप राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर केला आहे. (Sanjay Raut News)

ईडी (ED) ही संस्था भाजपची (BJP) एक शाखा आहे. अनेक सामाजिक संस्थांनी मुंबईसह महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) खूप मोठे सामाजिक काम केले. दोन अडीच वर्षात आम्ही ज्याप्रकारचे काम केले ते संपूर्ण देशात कुठे झाले नाही. ईडीचे काम दोन पाच लाखाची चौकशी करणे हे आहे का? ईडीची पातळी एवढी खाली घसरली का? कोट्यवधी रुपयांचे घोटाळे करून लोक भाजपमध्ये जात आहेत. यावेळी केंद्रीय तपास यंत्रणा मात्र गप्प बसतात. आम्ही घाबरत नाही. आम्ही लढवय्ये आहोत आमच्यावर जी कारवाई करायची ती करा, असा थेट इशारा संजय राऊतांनी दिला.

Sanjay Raut, Eknath Shinde
Manoj Jarange: रायगडावरून जरांगेंची मोठी घोषणा: मराठा आरक्षणानंतर 'या' समाजासाठी आता लढा उभारणार

सोमय्यांविरोधात पाच महिला तक्रार करण्यासाठी पुढे आल्या...

किरीट सोमय्यांच्या (Kirit Somaiya) विरोधात पाच महिला तक्रार द्यायला तयार असल्याचे राऊतांनी सांगितले. किरीट सोमय्या आम्हाला चॅलेंज करायला निघाले आहेत. महाराष्ट्रातले उद्योग पळवून नेले जात आहेत. आठ हजार कोटींचा ॲम्बुलन्स घोटाळा, अजित पवारांचा (Ajit Pawar) सिंचन घोटाळा आहे. त्यावर काहीतरी बोला, असे आव्हान त्यांनी सोमय्यांना दिले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपकडे लढण्याचे बळ नसल्याने फोडाफोडी

भाजपकडे लढण्याचे बळ नसल्याने सगळ्याच पक्षातून फोडाफोडी सुरू आहे. 2024 ला सरकार बदलणार आहे म्हणूनच फोडाफोडी करत आहेत. भाजप 400 पार करू शकत नाही. म्हणूनच नितीशकुमार, शिवसेना, राष्ट्रवादीला तोडा, नेत्यांवर रेड करा, ही नाटकं भाजप का करत आहे. यांचे 200 सुद्धा पार होऊ शकत नाहीत. प्रधानमंत्री जिंकतील मात्र त्यांचा पक्ष जिंकणार नाही, अशी टीका राऊतांनी केली.

महाविकास आघाडीची बैठक

जागावाटप संदर्भातल्या चर्चा अत्यंत सुरळीत आणि सकारात्मक झाल्या आहेत. कोणतेही मतभेद नाहीत. वंचित बहुजन आघाडी यांना आम्ही आज चर्चेला बोलावले आहे. हुकुमशाहीविरोधात लढ्यामध्ये वंचितची साथ मिळेल. त्यांच्या आणि आमच्या लढाईचा प्रवास एकच आहे. राजू शेट्टी यांच्याबरोबर देखील आमची चर्चा सुरू आहे. ते ज्या भागातून लढणार आहेत, ती जागा शिवसेनेची आहे. त्यामुळे आम्ही नक्कीच चर्चा करू, असे राऊतांनी स्पष्ट केले.

(Edited By - Rajanand More)

Sanjay Raut, Eknath Shinde
ACB News: महसूलमंत्र्यांच्या संस्थेकडून मागितली लाच! वजनमापे निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com