दोन कॅबिनेट मंत्र्यांसह ज्येष्ठ नेत्यांना तुरूंगात टाकण्याची ईडीची तयारी; राऊतांचा गौप्यस्फोट

संजय राऊत यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना लिहिलेल्या पत्रात अनेक गंभीर आरोप केले आहेत.
Sanjay Raut Letter To Vice President
Sanjay Raut Letter To Vice President Sarkarnama

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू (Venkaiah Naidu) यांना लिहिलेल्या पत्रात अनेक गंभीर आरोप केले आहेत. ठाकरे सरकार (Thackeray Government) पाडण्यासाठी ईडीकडून धमकावण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला आहे. तसेच सरकार पाडण्यासाठी मदत न केल्यास तुमच्यासह सरकारमधील दोन कॅबिनेट मंत्री आणि महाराष्ट्रातील दोन ज्येष्ठ नेत्यांना तुरूंगात जावे लागेल, अशी धमकीही ईडीने (ED) दिल्याचा गौप्यस्फोट राऊत यांनी केला आहे.

राऊतांच्या या दाव्यामुळं खळबळ उडाली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (ParamBir Singh) यांच्या लेटरबॉम्बनंतर तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना राजीनामा द्यावा लागला. सध्या ते मनी लाँर्डिंग प्रकरणात तुरूंगात आहेत. तर राऊतांच्या निकटवर्तियांसह शिवसेना व राष्ट्रवादीचे काही नेतेही ईडीच्या रडारवर आहेत. आता राऊतांनी उपराष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात केलेल्या दाव्यामुळे ते चार नेते कोण, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

Sanjay Raut Letter To Vice President
राऊतांचं उपराष्ट्रपतींना चार पानी पत्र अन् त्यावर आदित्य ठाकरेंकडून एकच शब्द...

राऊतांनी पत्रात म्हटले आहे की, महिनाभरापूर्वी काही जण आपल्याकडे आले होते. राज्य सरकार पाडण्यासाठी महत्वाची भूमिका बजावण्याबाबत त्यांनी विचारणा केली. राज्यात मध्यावधी निवडणुका व्हाव्यात, हा त्यामागचा उद्देश होता. पण मी त्याला धुडकावून लावले. मी नकार दिल्यास त्याची मोठी किंमत मोजावी लागले, माजी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांप्रमाणे अनेक वर्ष तुरूंगात घालवावी, लागतील, असा इशारा देण्यात आला.

तसेच माझ्याप्रमाणेच राज्य सरकारमधील दोन ज्येष्ठ मंत्री आणि महाराष्ट्रातील दोन ज्येष्ठ नेत्यांना पीएमएलए कायद्यांतर्गत तुरुंगात जावे लागेल. त्यामुळे राज्यात मध्यावधी निवडणुका होतील आणि सर्व महत्वाच्या नेत्यांना तुरुंगात जातील, असा धमकी दिल्याचा गौप्यस्फोट राऊत यांनी पत्रात केल्यानं खळबळ उडाली आहे. केंद्र सरकारकडून ईडीचा गैरवापर केला जात असल्याचा आरोपही राऊतांनी केला आहे.

दरम्यान, राऊत यांनी हे पत्र उपराष्ट्रपतींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे नेते राहुल गांधी, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे, तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन यांच्यासह डीएमके, आप, एआयडीएमके, बसपा. समाजवादी पक्ष, आरजेडी आणि टीआरएसच्या नेत्यांनाही पाठवलं आहे.

वैयक्तिक मालमत्ता जप्त करण्याची धमकी

आमच्या पक्षाचे आमदार, खासदार, राजकीय नेते तसेच त्यांचे नातेवाईक, मित्र आणि परिचित यांना धमकावण्यास आणि त्यांचा छळ करण्यात येत असल्याचाही आरोप राऊत यांनी केला आहे. 2012-2013 मध्ये मला आणि माझ्या कुटुंबाला अशीच छोटी जमीन विकणाऱ्या इतर लोकांसोबतही हे घडत असल्याचे त्यांनी सांगितले. दिवसेंदिवस ईडी आणि इतर एजन्सींचे कर्मचारी या लोकांना फोन करतात आणि त्यांना तुरुंगात टाकण्याची आणि त्यांची वैयक्तिक मालमत्ता जप्त करण्याची धमकी देत असल्याचे संजय राऊत यांनी पत्रात म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com