Abdul Sattar On Saamana : शिवसेना मुखपत्र 'सामना'वर अब्दुल सत्तार थेट ठोकणार दावा; काय आहे प्रकरण?

Abdul Sattar On Saamana : सामना विरोधात सत्तारांनी थोपटले दंड..
Abdul Sattar On Saamana :
Abdul Sattar On Saamana :Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्याचे कृषिमंत्री आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसनेचे नेते अब्दुल सत्तार (Abdul Sattar) आता थेट शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रावर (Saamana Editorial) अब्रु-नुकसामीचा दावा ठोकणार आहेत. सत्तार यांनी १५० कोटींचा अपहार केला, अशा आशयाच्या बातम्या छापल्या म्हणून, सत्तारांकडून ही नोटीस पाठवली जाणार आहे.

Abdul Sattar On Saamana :
Brijbhushan Singh Chargesheet : ब्रिजभूषणच्या अडचणी वाढणार; पोलिसांनी पुरावे गोळा केले, व्हिडीओ-फोटो..

अब्दुल सत्तार म्हणाले, '१५० कोटींचा निविदा काढल्या, असं सामनात छापून आलं. यामध्ये आमचा सबंध नाही. याबाबत आरोप करणाऱ्यांनाच स्पष्टीकरण द्यावे लागेल. विरोधपक्ष नेते अंबादास दानवे यांनीही माझ्यावर आरोप केले होते. आरोप करताना त्यांनी सत्यता पडताळून घ्यावी."

अब्दुल सत्तार पुढे म्हणाले, "माझ्या विभागाकडून जी माहिती घेतली, विभाग आयुक्तांनी सांगितलं की, अशी कोणतीही निविदा काढलेली नाही. यात १५० कोटींचा घोटाळा झाला असा आरोप करतात, पण पुरावे नसताना विरोधीपक्ष नेत्यांनी अंबादास दानवेंनी आरोप करू नये. आता याबाबत कायदेशीर नोटीस पाठवणार आहे. आरोप करणारे काय उत्तर देतात, याच्यावर पुढील कार्यवाही होईल. "

Abdul Sattar On Saamana :
Ashish Deshmukh Meet Gadkari : काँग्रेसचे निलंबित नेते आशिष देशमुख गडकरींच्या भेटीला; भाजप प्रवेशानंतर काटोल की सावनेर? चर्चांना उधाण..

अब्दुल सत्तारांवर काय आहेत आरोप?

कृषी उद्योग विकास महामंडळात १५० कोटींचा घोटाळा झाला असून, सेंद्रिय कीटकनाशकांच्या खरेदीसाठी काढलेल्या निविदेत हा घोटाळा झाल्याचे, ठाकरे गटाने आरोर केला होता. एकाच संचालकाकडे दोन संस्था सांभाळून निविदा दिल्याचा आरोप करण्यात आला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com