Sanjay Raut Vs Amit Shah : लालबागचा राजा देखील गुजरातला नेणार नाहीत ना?

Sanjay Raut criticizes Amit Shah visit to Mumbai : भाजप नेते केंद्रीय मत्री अमित शाह यांच्या महाराष्ट्रातील मुंबई दौऱ्यावर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली.
Sanjay Raut Vs Amit Shah 1
Sanjay Raut Vs Amit Shah 1Sarkarnam
Published on
Updated on

Mumbai News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या महाराष्ट्रातील मुंबई दौऱ्याविषयी मोठी भीती व्यक्त केली. अमित शाह मुंबईतील लालबागचा राजाचं आज दर्शन घेणार आहेत. याबाबत संजय राऊत यांनी भीती व्यक्त केली.

"मला सारखी भीती वाटते, ज्याप्रमाणे मुंबईतील अनेक उद्योग गुजरातमध्ये पळवले, अनेक संस्था पळवल्या, त्याचप्रमाणे लालबागचा राजा देखील गुजरातला नेणार नाहीत ना!", अशी भीती संजय राऊत यांनी अमित शाह यांच्या दौऱ्याविषयी व्यक्त केली.

अमित शाह (Amit Shah) आज मुंबई दौऱ्यावर असून ते सायंकाळी लालबागचा राजाचं दर्शन घेणार आहे. त्यांच्या मुंबई दौऱ्यावर खासदार संजय राऊथ यांनी सडकून टीका केली. संजय राऊत म्हणाले, "लालबागचा राजा दर्शनाला येत आहेत, तर येऊ द्यात. पण मला सारखी भीती वाटते, ज्याप्रमाणे मुंबईतील अनेक उद्योग गुजरातमध्ये पळवले, अनेक संस्था पळवल्या, त्याप्रमाणे लालबागचा राजा देखील गुजरातला नेणार नाही ना!"

'हो सकता, कुछ भी कर सकते है, यह लोक, लालबागच्या राजाचं मोठं नाव आहे. देशातून लोकं येतात. प्रेशर आणतील, ले चलो गुजरात को, यह लोक कुछ भी कर सकते है. तसा प्रस्तावच देतील, कल से लालबाग का राजा गुजरात मैं चलेगा, यह व्यापारी लोक आहे, मैं सोच समज से बोल रहा हूं', असंही खासदार राऊत यांनी म्हटलं.

Sanjay Raut Vs Amit Shah 1
Yogesh Kadam Vs Aniket Kadam : कदम भावांमध्ये जुंपली; योगेश कदम म्हणाले, 'आमच्या कुटुंबात वाद लावला जातोय'

संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अमित शाह यांच्या राजकारणावर टीका करताना, "त्यांनी महाराष्ट्रात दळभ्रदी राजकारण केलं. महाराष्ट्र कमजोर केला. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबई महाराष्ट्रातून व्यापार, उद्योग, व्यवहार, रोजगार, अनेक महत्त्वाची आर्थिक केंद्र गुजरातला नेण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामुळे अमित शाह यांच्याबाबत महाराष्ट्रात भावना तीव्र आहेत. आज ते कमजोर गृहमंत्री आहेत".

'या महाराष्ट्राची कायदा आणि सुव्यवस्था पूर्ण ढासळलेली आहे. जम्मू-काश्मीर, मणिपूर आणि इतर भागातील कायदा-सुव्यवस्थेकडे अमित शाह यांचे लक्ष नाही. राजकारण, पक्षफोडी, लूटमार आणि पाठिंबा देणे, मुंबई लुटणाऱ्यांना पाठिंबा देणं, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अशी स्वाभिमानी पक्ष फोडून, महाराष्ट्र अधिक कमजोर करण्याची काम त्यांनी केली. हे त्यांचं काम नाही', असेही संजय राऊत यांनी म्हटलं.

Sanjay Raut Vs Amit Shah 1
Mahayuti News : महायुतीचा सत्ता राखण्यासाठीचा प्लॅन तयार; तीन पक्षांनी घेतली इतक्या जागांची जबाबदारी

यांना बरीच राज्य लुटायचीत

"महाराष्ट्र विकलांग करायचं, दुरबळ करायचा, हे त्यांचे स्वप्न आहे. म्हणून ते मुंबई येतात. महाराष्ट्रात येतात. त्यामुळे महाराष्ट्राची जनता त्यांना शत्रू मानते. यह आपने आप को, महाराष्ट्र को, दुश्मन मानते हैं. बरीच राज्य आहेत, ती यांना लुटायची आहे. बीजेपीच्या लोकांना लुटायची आहेत. गृहमंत्री अमित शाह यांनी सर्वांना समान न्याय दिला पाहिजे. पार्टी फोडो, न्यायालयावर दबाव, निवडणूक आयोगावर दबाव आणणे हेच काम गृहमंत्री करत आहेत. देशाच्या इतिहासात याची नोंद राहील", असे देखील संजय राऊत यांनी म्हटलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com