Shiv Sena symbol dispute: शिवसेना कुणाची? आता कोर्टानं ठाकरेंच्या विरोधात निकाल दिला तरी चालेल..; कारणं पुढे येतील...

Shiv Sena Symbol Verdict Eknath Shinde Vs Uddhav Thackeray Asim Sarode Reaction:उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन गटांमध्ये शिवसेना पक्षनाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हावरून सुरू असलेला वाद सुमारे तीन वर्षे सुप्रीम कोर्टात न्यायप्रविष्ट आहे.
Eknath Shinde-Uddhav Thackeray
Eknath Shinde-Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

सुमारे तीन वर्षांपूर्वी शिवसेनेत फूट पडून राज्याचे राजकारण ढवळून निघाले, शिवसेना, धनुष्यबाण कुणाचा यावरुन कोर्टात सुनावणी सुरु आहे. या खटल्याचा निकाल कधी लागणार याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे. काल (बुधवारी) सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार होती. ती पुढे ढकलण्यात आली आहे.

न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूती उज्ज्वल भुइया आणि न्यायमूर्ती एन. के. सिंह यांच्या खंडपीठासमोर ही याचिका आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना अधिकृत शिवसेना पक्ष म्हणून मान्यता दिली आहे. त्यामुळे शिंदेंकडेच धनुष्यबाण हे पारंपरिक चिन्हही राहिले आहे. निवडणूक आयोगाच्या या निकालाला उद्धव ठाकरेंनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हावर निकाल जाहीर झाला तर राज्यातील सर्वच राजकीय समीकरणे बदलतील. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन गटांमध्ये शिवसेना पक्षनाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हावरून सुरू असलेला वाद सुमारे तीन वर्षे सुप्रीम कोर्टात न्यायप्रविष्ट आहे. फेब्रुवारी २०२३ मध्ये निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला शिवसेना हे नाव व चिन्ह दिले आहे.

ही सुनावणी होण्यापूर्वीच बुधवारी सर्वोच्च न्यायालयात ठाकरेंच्या शिवसेनेची बाजू मांडणारे वकील असीम सरोदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. प्रश्न उपस्थित केला होता. न्यायमूर्ती सूर्य कांत यांनी, आम्ही यावर 12 नोव्हेंबरला सुनावणी घेऊ, असे स्पष्ट केले. आज असीम सरोदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करीत याबाबत आणखी विधान केले आहे.

Eknath Shinde-Uddhav Thackeray
Ajit Pawar: अजितदादांनी शहराध्यक्षच फोडला! लगेचच केली राष्ट्रवादी शहराध्यक्षपदी नियुक्ती; शरद पवारांच्या पक्षाला मोठा धक्का!

शिवसेना पक्षचिन्ह व अपात्रतेसंदर्भात घटनाबाह्य निकाल दिल्याने शिंदेंना मुख्यमंत्री होता आले.याबाबत काय असेल तो निर्णय आता सर्वोच्च न्यायालयाने दिला पाहिजे.अगदी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात निकाल दिला तरीही चालेल पण विरोधी निकालाची कारणे तर पुढे येतील.सत्य काय ते जनतेला माहिती आहे, असे सरोदे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

12 नोव्हेंबरला सुनावणी घेऊ, असे कोर्टानं स्पष्ट केल्यानंतर ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी लगेच आमदार अपात्रतेचा मुद्दा उपस्थित केला. महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांना अपात्र घोषित करण्यास नकार दिल्याच्या निर्णयाविरोधात याचिकाही सूचीबध्द करण्याची मागणी सिब्बल कोर्टाला केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com