Ambadas Danve
Ambadas DanveSarkarnama

Ambadas Danve : 'भाजपकडून रोजच संविधानाची हत्या...'; दानवेंची भाजपच्या 'त्या' निर्णयावर टीका

Ambadas Danve On BJP Government : केंद्र सरकारच्या 'संविधान हत्या दिवस' पाळण्याचा निर्णयावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जोरदार टिका केली आहे. भाजपचा हा निर्णय त्यांना देखील शोभत नाही. भाजप सत्तेत आल्यापासून रोज संविधानाची हत्या होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
Published on

Ambadas Danve On BJP : केंद्र सरकारने 25 जून हा दिवस 'संविधान हत्या दिवस' म्हणून पाळण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप केंद्र सरकारच्या या निर्णयावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी चांगलेच सुनावले आहे.

"भाजप संविधानाची रोज हत्या करत आहे. त्यांना संविधानावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही आणि ते संविधान हत्या दिवस पाळत आहेत, हे भाजपला शोभत नाही", अशी टीका दानवे यांनी केली.

अंबादास दानवे (Ambadas Danve) म्हणाले, "देशात भाजप सत्तेत आल्यापासून रोज संविधानाची हत्या करत आहे. विधानसभा अध्यक्षाने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांच्या अपत्रता निकालाबाबत काय निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयाने काय मार्गदर्शन तत्व सांगितली होती. त्यामुळे संविधानाची हत्या भाजप रोज करत आहे, संविधानावर बोलण्याचा त्यांना नैतिक अधिकार देखील नाही."

Ambadas Danve
Nana Patole News : नानाभाऊंचा पक्षसंघटनेवर 'कंट्रोल' की उथळ पाण्याला खळखळाट...

देशात 25 जून 1975 साली आणीबाणी (Emergency) लावण्यात आली होती. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी हा निर्णय घेतला होता. आणीबाणीच्या काळात ज्यांनी अमानवी यातना भोगल्या, त्यांच्या योगदानाच्या आठवणीसाठी केंद्र सरकारने 25 जून हा दिवस संविधान हत्या दिवस म्हणून पाळण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर विरोधकांकडून टिका केली जात आहे.

Ambadas Danve
Assembly Election 2024 : महायुती की महाविकास आघाडी, विधानसभेला जनतेचा कौल कुणाला? मोठा सर्व्हे समोर

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shaha) यांनी हा निर्णय का घेतल्याचे कारण सांगितले असतानाच काँग्रेसकडून मात्र यावर जोरदार हल्ला चढवला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दांभिकपणा, मथळ्यांचे व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न असल्याची टिका काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com