Amol Kirtikar News : बापासाठी लेक धावला, कारवाईची मागणी करणाऱ्या शिशिर शिंदेंना चांगलंच सुनावलं

Shiv Sena : गजानन किर्तीकर यांनी केलेल्या कामांचे आणि निधीचे श्रेय अमोल किर्तीकर यांनी घेतल्याचा आरोप देखील शिशिर शिंदे यांनी केला होता. त्याला देखील अमोल किर्तीकर यांनी प्रत्युत्तर दिले.
Gajanan Kirtikar Amol Kirtikar Shishir Shinde
Gajanan Kirtikar Amol Kirtikar Shishir Shindesarkarnama

वैदेही काणेकर

Maharashtra Political News : पाचव्या टप्प्यामध्ये मुंबईतील सहा जागांसाठी मतदान झाले. मात्र, मतदानानंतर देखील आरोप प्रत्यारोप थांबले नाही. मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघामध्ये ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांना शिंदे गटातील त्यांचे वडील गजानन किर्तीकर यांची मदत झाल्याचा आरोप करत शिंदे गटातील शिशिर शिंदे यांनी गजानन किर्तीकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना Eknath Shinde लिहिले. यावर गजानन किर्तीकर यांनी शिशिर हे भावनिक आहेत, असे म्हणत हा विषय ताणला नाही. मात्र, ठाकरे गटातील त्यांचे पुत्र अमोल किर्तीकर यांनी मात्र शिशिर शिंदेंना चांगलेच सुनावले आहे.

Gajanan Kirtikar Amol Kirtikar Shishir Shinde
Malegaon City Politics : मालेगावमध्ये राहुल गांधींचे खटाखट.. खटाखट.. डॉ. भामरेंना बसवणार घरी?

अमोल किर्तीकर Amol Kirtikar म्हणाले, येणाऱ्या काळात राज्यपाल नियुक्त आमदारांची निवड होईल. विधान परिषदेच्या पदवीधरच्या आमदारकी येणार आहेत. त्यामुळे काही गोष्टी मिळवण्यासाठी काहीतरी आरोप प्रत्यारोप करावे लागतात. प्रसिद्धीमध्ये यावे लागते म्हणून हे आरोप त्यांनी केले आहेत. कारण याच्या आधी कधीच त्यांनी असे आरोप केले नाहीत. आणि मुख्य म्हणजे उत्तर पश्चिमची त्यांचा काय संबंध? असेल तर त्याचे फुटेजही दाखवावे. अचानक आरोप करतात. काहीतरी बोलायचं आणि काहीतरी मिळवायचं , असा त्यांचा भाग आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, असा टोला ही अमोल किर्तीकरांनी शिशिर शिंदे यांना लगावला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गजानन किर्तीकर Gajanan Kirtikar यांनी केलेल्या कामांचे आणि निधीचे श्रेय अमोल किर्तीकर यांनी घेतल्याचा आरोप देखील शिशिर शिंदे यांनी केला होता. त्याला देखील अमोल किर्तीकर यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, निधीचा वापर कसा केला? कुठे केला? याबद्दल त्यांनी कुठून अभ्यास केला हे माहीत नाही. गजानन कीर्तिकर यांना धनुष्यबाणावर निवडून आणण्यासाठी शिवसैनिकांनी काम केले होते. तोवर निधी आणि इतर काम अनेक लोक करत होतो. गेल्या एक वरषांमध्ये आम्ही त्यांच्यासोबत कुठलेच काम केली नाही. त्या कामाचे क्रेडिटही आम्हाला नकोय. मात्र विचित्र पद्धतीने आमच्यावर आरोप होत असतील तर त्यांच्या पक्षाचा आणि कार्यकर्त्यांचा तो कमजोरपणा आहे, असं मला वाटतं.

चार तारखेला अमोल किर्तीकर विजयी झाले तर बाप म्हणून आनंद वाटेल असं गजानन कीर्तिकर यांनी म्हटले होते. त्यावर अमोल कीर्तिकर म्हणाले, वडील म्हणून प्रत्येकाला आनंद वाटेल. बाकी इतर नेत्यांची मुलं निवडणुकीत उतरली आहेत. भले ती त्याच पक्षात असू दे वा वेगळ्या पक्षात असू दे, निवडणूक लढत आहेत. ज्याला महाराष्ट्राची संस्कृती कळते त्याला हिंदू धर्म कळतो. त्याला एवढं तर नक्की माहिती पाहिजे की आई वडिलांचा आशीर्वाद आपल्या मुलांसाठीच असतो. आणि हे ज्याला कळत नाही त्याला महाराष्ट्र धर्मही कळत नाही आणि हिंदू धर्म ही कळत नाही.

(Edited By Roshan More)

Gajanan Kirtikar Amol Kirtikar Shishir Shinde
Kolhapur Latest Politics : जिल्ह्यातील ठाकरे गट, राष्ट्रवादीची 'नेतेगिरी' कोण करणार?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com