संभाजीराजे-सेना नवा ट्विस्ट : दुपारी बारापर्यंत `शिवबंधन` बांधण्याची मुदत; अन्यथा...

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आपल्या भूमिकेवर ठाम
CM Uddhav thackeray, SambhajiRaje Chhatrapati Latest Marathi News
CM Uddhav thackeray, SambhajiRaje Chhatrapati Latest Marathi NewsSarkarnama

मुंबई : संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje) यांना राज्यसभेवर कशा पद्धतीने पाठवायचे, या घडामोडींत नवा ट्विस्ट आला आहे. शिवसेना ही संभाजीराजेंना पुरस्कृत उमेदवार म्हणून पाठिंबा देण्यास तयार असल्याच्या वृत्तानंतर प्रत्यक्षात वेगळेच घडल्याचे समोर आले आहे. शिवसेना पुरस्कृत नाहीतर शिवबंधन बांधून सेनेत प्रवेश केल्यानंतरच पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून पाठिंबा देणार असल्याचे शिवसेनेतर्फे संभाजीराजेंना स्पष्ट सांगण्यात आले आहे. (Rajya Sabha election update 2022) याचा अर्थ शिवबंधन बांधले नाही तर शिवसेना पर्यायाचा विचार करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

हे शिवबंधन बांधूनच राज्यसभेसाठी अर्ज दाखल करण्याचा आदेशवजा निरोप शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी संभाजीराजेंना रविवारी दुपारी सव्वातीन वाजता धाडला. मंत्री उदय सामंत, खासदार अनिल देसाई आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकरांनी ओबेराय हॉटेलमध्ये जाऊन, ठाकरेंचा निरोप संभाजीराजेंना एकविला. त्याचवेळी खासदार संजय राऊत यांनीही शिवबंधनाची अट असल्याचे संभाजीराजेंच्या कानावर घातले. या फर्मानानुसार संभाजीराजेंनी सोमवारी दुपारी १२ वाजता शिवबंधन बांधावे, यावर ठाकरे ठाम राहिले आहे.

CM Uddhav thackeray, SambhajiRaje Chhatrapati Latest Marathi News
उद्धव ठाकरे आणि संभाजीराजे समेट : शिवसेना पुरस्कृत म्हणून राज्यसभेत जाणार

संभाजीराजेंनी शिवसेनेची अधिकृत उमेदवारी स्वीकारणार नसल्याचे या आधी जाहीर केले असले तरी आता ठाकरेंच्या ठाम भूमिकेवर ते काय प्रतिसाद देणार यावर साऱ्या घडामोडी अवलंबून आहेत.

ठाकरेंच्या अटी धुडकाणाऱ्या संभाजीराजेंना शिवसेना पुरस्कृत करण्याची तयारी शिवसेनेची असल्याची चर्चा पसरली. त्यानंतर लगेचच काही मिनिटांतच संभाजीराजेंना थांबलेल्या हॉटेलमध्ये सामंत, देसाई आणि नार्वेकर दाखल झाले आणि शिवबंधन बांधण्याची बंधन सांगितले. त्यानंतरही संभाजीराजे द्विधा मन:स्थितीत राहिल्याने शिष्टमंडळाने थेट संजय राऊत यांना फोन लावला. राऊत यांनीही मग संभाजीराजेंना ठाकरेंची भूमिका समजावून सांगितली. मात्र, उमेदवारी अर्जावर अपक्ष म्हणूनच उल्लेख करण्यावर संभाजीराजे कायम असल्याचे आताचे तरी चित्र आहे. राजेंचा प्रतिसाद मिळत नसल्याने नाराज होऊन सामंत, देसाई आणि नार्वेकर या तिघांनीही ओबेरायमधून त्यांचा निरोप घेतला आणि पुन्हा ठाकरेंच्या भेटीला गेले.

CM Uddhav thackeray, SambhajiRaje Chhatrapati Latest Marathi News
पवार, राऊत आणि संभाजीराजे दिल्लीत नियमित भेटत होते.... तेव्हाच ठरवले जात होते..

संभाजीराजे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करून पुढची पावले उचलणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. परंतु, ठाकरे आपल्या भूमिकेपासून एकही पाऊल मागे यायला तयार नसल्याचे तूर्त दिसत आहे. शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची भूमिका पवार यांनी या आधीच जाहीर केली असल्याने तेथेही सेनेचा शब्द अंतिम ठरणार असल्याचे चित्र आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com