शिंदे गटाचे आमदार आमच्या संपर्कात, पुन्हा सत्ता परिवर्तन झाले तर आश्चर्य वाटून घेऊ नका!

Sanjay Raut latest news | मुख्यमंत्र्यांना दिल्लीत यावं लागतं, त्यामुळे ते त्यांचा मुक्काम दिल्लीत हलवणार आहेत का ?
MP Sanjay raut
MP Sanjay rautSarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : "शिंदे गटातील काही आमदार अस्वस्थ आहेत, त्यांना फसवले गेले. तेच आमदार आता आमच्या संपर्कात आहेत त्यामुळे सत्तापरिवर्तन अटळ असेल. महाराष्ट्रात उद्या पुन्हा सत्ता परिवर्तन झाले तर यात आश्चर्य वाटून घेऊ नका," असा विश्वास शिवसेना नेते संजय राऊत (Shivsena Leader Sanjay Raut) यांनी आज व्यक्त केला. राऊत माध्यमांशी बोलत होते. (Sanjay Raut latest news)

राऊत म्हणाले, " महिना झाला तरी दोघांचेच कॅबीनेट असून ते बेकायदेशिर निर्णय घेत आहेत. त्यात महाराष्ट्र आणि शिंदे यांच्या गटाला (eknath shinde) काय मिळत आहे. शिवसेनेतून बाहेर पडून काय मिळवले याचे आत्मचिंतन करावे लागेल,"

"राज्याचे मुख्यमंत्री वारंवार दिल्लीत जात आहे. एकाच महिन्यात पाच वेळेस मुख्यमंत्र्यांना दिल्लीत यावं लागतं, त्यामुळे ते त्यांचा मुक्काम दिल्लीत हलवणार आहेत का, असा प्रश्न राज्यातील जनतेच्या मनात निर्माण झाला आहे," असा टोला राऊतांनी लगावला.

गुढघे टेकणार नाही

"खोट्या पद्धतीने संजय राऊतांना अटक ईडीकडून होणार असेल तर मी मला वाचवा असे म्हणणार नाही मी गुढघे टेकणार नाही. मी कोणत्याही कारवाईला समोर जाणार. माझ्यावरील कारवाईने पक्षाला बळ मिळत असेल तर ते मला करायलाच हवे," असे राऊत म्हणाले.

राऊत म्हणाले, " राज्यकर्ते विरोधी पक्षाला संपवण्याचा प्रयत्न करीत आहे हे लोकशाहीचे दुर्दैव आहे. गुजरातेतील विषारी दारुबाबत प्रश्व विचारत आहोत पण ते आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत. महागाई आणि देशातील ज्वलंत प्रश्नावर आम्ही चर्चा मागत आहोत.,"

राज्य घटनेची सीमा ओलांडून सुप्रीम कोर्ट निर्णय देणार नाही, असा विश्वास वाटतो. त्यामुळे 16 आमदार अपात्र ठरतील अथवा फुटीर गटाला इतर पक्षात सामिल व्हावे लागेल, दुसऱ्या पक्षात विलीन होण्याबाबत अनेक आमदारांची तयारी नाही. त्यामुळे त्यातील अनेकजण पुन्हा येतील, असा विश्वास राऊतांनी यावेळी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com