Shambhuraj Desai : मंत्री मुंडे भगवान गडाचे भक्त; मंत्री देसाई म्हणाले, 'महंतांनी त्यांना मोकळ्या...'

ShivSena Minister Shambhuraj Desai NamdevShastri Maharaj Bhagwangad supporting Beed Minister Dhananjay Munde : मंत्री धनंजय मुंडे यांची पाठराखण करणारे नामदेवशास्त्री महाराजांच्या भूमिकेवर मंत्री शंभुराज देसाई यांची प्रतिक्रिया.
Shambhuraj Desai 1
Shambhuraj Desai 1Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मंत्री धनंजय मुंडे यांनी काल भगवान गडावर मुक्काम करताना महंत नामदेवशास्त्री महाराज यांची भेट घेतली. यानंतर नामदेवशास्त्री महाराज यांनी मंत्री मुंडे गुन्हेगारी नाहीत, त्यांना चुकीची वागणूक मिळत आहे, अशी बाजू घेतली.

याचे पडसाद आता राज्याच्या राजकारणात उमटू लागले असून, नामदेवशास्त्री महाराजांच्या भूमिकेवर जोरदार टीका होत आहे. यात शिवसेनेचे नेते मंत्री शंभुराज देसाई यांनी मंत्री मुंडे आणि नामदेवशास्त्री महाराज यांच्या भेटीचे समर्थन केले आहे.

मंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी, भगवान गड हे स्थान असा आहे की, तिथं देशातल्या, महाराष्ट्राच्या कानाकोपाऱ्यातून लोकं श्रद्धेच्या भावनेनं नतमस्तक होण्यासाठी जात असतात. मंत्री मुंडे देखील श्रद्धाळू भावनेतून तिथं गेले, असे सांगितले.

Shambhuraj Desai 1
Manoj Jarange On NamdevShastri Maharaj : नामदेवशास्त्रींकडून मंत्री मुंडेंची पाठराखण, मनोज जरांगे चांगलेच भडकले (पाहा VIDEO)

'या दर्शनानंतर भगवान गडावरील महंतांनी त्यानंतर विधान केले की, मंत्री मुंडे (Dhananjay Munde) यांच्यामागे भगवान गडाची ताकद उभी करू. एका भक्त जेव्हा आपल्याकडे येतो, श्रद्धाळू भावनेने येतो, नतमस्तक होतो, अशावेळी महंतांनी त्यांना आशीर्वाद देतात. महंतांचे, त्या जागेचे वेगळं महत्त्व, वेगळी श्रद्धा आहे. आलेल्या भक्ताला मोकळ्या हाताने पाठवायचे नाही, आशीर्वाद द्यायचे, पाठबळ द्यायचे, या भूमिकेतून नामदेवशास्त्री महाराजांचे वक्तव्य आले, हा तोच भाग आहे', असे मंत्री शंभुराज देसाई यांनी म्हटले.

Shambhuraj Desai 1
Girish Mahajan : 'ऑपरेशन टायगर' होणारच, गिरीश महाजनांचा दावा

नामदेवशास्त्री नेमकं काय म्हणाले

"मंत्री मुंडे यांच्या पाठिशी आपण भक्कमपणे उभे आहोत. धनंजय मुंडे हा गुन्हेगार नाही, असे मी शंभर टक्के सांगतो. जाणीवपूर्वक त्यांना त्रास दिला जात आहे. त्यांची पार्श्वभूमी गुन्हेगारीची नाही, गोपीनाथ मुंडे यांचा तो पुतण्या आहे. संवेदनशील मुद्दावरुन राजकारण करणं ही चुकीची पद्धत आहे", मंत्री मुंडे यांची अशी पाठराखण नामदेवशास्त्री यांनी केली.

संजय राऊत यांच्यावर टीका

दरम्यान, मंत्री शंभुराज देसाई यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, "मनाला येईल ते बोलतात. उपमुख्यमंत्री शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालील शिवसेना कालही भक्कम होती, आजही भक्कम आहे, उद्याही भक्कम राहील. आमच्यातला एकही नेता एकही पदाधिकारी शिंदेसाहेबांना आणि शिवसेनेला सोडून जाणार नाही. नजीकच्या काळामध्ये शिवसेनेमध्ये अधिक लोकांचा समावेश होईल".

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com