Shivsena MLA Disqualification: शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण मोठी अपडेट ; नव्या वर्षांत नार्वेकर देणार निकाल

Supreme Court: १० जानेवारीपर्यंत वेळ वाढवून दिला आहे.
CM Shinde, Rahul Narwekar, Uddhav Thackeray
CM Shinde, Rahul Narwekar, Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai Political News: शिवसेनेच्या सोळा आमदारांच्या अपात्रता निकाल देण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना आता दोन आठवड्याचा वेळ वाढवून मिळाला आहे. न्यायालयाने नार्वेकरांना १० जानेवारीपर्यंत वेळ वाढवून दिला आहे. हा निकाल देण्यासाठी वेळ वाढवून देण्याची विनंती विधानसभा अध्यक्षांनी सर्वोच्च न्यायालयाला केली होती.

शिवसेनेच्या सोळा आमदारांच्या अपात्रता प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर काही दिवसांपासून सुनावणी सुरु आहे. शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांची सध्या उलट तपासणी सुरु असून काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची‌ फेरसाक्ष पूर्ण झाली. आता साक्ष नोंदवण्याचे काम सुरु आहे.

CM Shinde, Rahul Narwekar, Uddhav Thackeray
Parliament Security Breach: सागरच्या डायरीतून उलगडताहेत अनेक गुपितं; ते 30 फोन नंबर कुणाचे? 'सरफरोशी की तमन्ना...'

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सुप्रीम कोर्टाने 31 डिसेंबरपर्यंत सुनावणी घेऊन अंतिम निर्णय जाहीर करण्याचे आदेश दिले होते. पण "20 डिसेंबरपर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण केली जाईल. मला 2 लाख 71 हजार पानांचं वाचन करायचं आहे. त्यामुळे 30 डिसेंबरपर्यंतचा काळ कमी पडतोय. त्यामुळे आणखी तीन आठवडे द्या,अशी विनंती नार्वेकरांनी न्यायालयाकडे केली होती. न्यायालयाने त्यांची मागणी मान्य करीतपण 10 दिवसांची मुदत वाढून दिली आहे.

"20 डिसेंबरला मी निकाल राखून ठेवणार आहे. मला तीन आठवडे वाढवून द्या. कारण मला जजमेंट लिहावा लागेल. त्यामुळे कोर्टाने सांगितलं की आम्ही तुम्हाला 10 जानेवारीपर्यंतचा वेळ देतो. ते राहुल नार्वेकरांच्या वकिलांनी मान्य केले.

आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल 31 डिसेंबरपर्यंत देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर विधानसभा अध्यक्षांसमोरील सुनावणीला वेग आला. सध्या सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनातही नियमितपणे सुनावणी सुरु आहे. सध्या शिंदे गटाच्या आमदारांची उलट तपासणी सुरु आहे. आता 20 डिसेंबरपर्यंत दोन्ही गटाच्या साक्षी नोंदवणे, तसेच उलट तपासणीचं काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.

CM Shinde, Rahul Narwekar, Uddhav Thackeray
CM Mohan Yadav: मुख्यमंत्री यादव योगींच्या वाटेवर: घेतले तीन मोठे निर्णय, मध्य प्रदेशातही 'बुलडोझर' राज

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com