Rahul Shewale: मोठी बातमी: शेवाळेंवर आरोप करणारी तरुणी तासाभरातच पोलिस ठाण्यात हजर राहणार; तपासाची चक्रे फिरणार

Mumbai News: जामिनीमुळे दोन वर्षानंतर पहिल्यांदाच ही तरुणी मुंबईत येणार असल्याने शेवाळेंची झोप उडाली आहे. तर दुसरीकडे ही तरुणी काही मंडळींना भेटण्याची शक्यता नाकारता येत नाही. ती मंडळी विरोधक असण्याची शक्यता आहे.
Rahul Shewale
Rahul ShewaleSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : दक्षिण मुंबई मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार, शिवसेनेचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांच्याविरोधात बलात्काराचा गंभीर आरोप करणाऱ्या तरुणीला कोर्टाने काही अटींवर अंतरिम जामीन मंजूर केला आहे. ही तरुणी आज सकाळी अकरा वाजता गोवंडी पोलिस ठाण्यात हजर राहणार असल्याची माहिती आहे.

साकीनाका आणि गोवंडी पोलिस ठाण्यात प्रतिमा मलीन करणे, ब्लॅकमेलिंग, धमकावणे असे आरोप संबधीत महिलेवर आहेत. शेवाळे यांनीच याप्रकरणी कोर्टात धाव घेतली होती. तर त्यांच्या पत्नीने केलेल्या तक्रारीनुसार गोवंडी पोलिस ठाण्यातही त्याचवर्षी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याप्रकरणी संबंधित तरुणीला वर्षभरापुर्वीच कोर्टाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. ही तरुणी पोलिस ठाण्यात हजर राहणार की नाही, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

Rahul Shewale
Pimpri News: "भाऊंच्या विरोधकाला जागा दाखवा" मतदानाच्या तोंडावरच दिवंगत आमदारांच्या समर्थकांनी लावले बॅनर

साकीनाका आणि गोवंडी दोन्ही पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये साधर्म्य आहे. तिच्या वकिलांनी साकीनामा गुन्ह्यातही जामीन देण्याची याचिका कोर्टात केली होती. जामीन देताना कोर्टाने त्यासाठी चार अटी घातल्या आहेत. तपास अधिकारी सांगतील त्यावेळी तपासात सहकार्य करावे, ही प्रमुख अट आहे.

लोकसभा निवडुकीची धामधुम सुरू असतानाच तरुणीला जामीन मिळाला आहे. त्यात तिच्याविरोधात शेवाळे आणि आणि त्यांच्या पत्नीच्या तक्रारीवरून दाखल झालेल्या गुन्ह्यात पोलिस तपास करणार आहेत. या तपासात सहकार्य करण्याचा आदेश हायकोर्टने दिला आहे. त्यामुळे ही तरुणी पुढच्या दोन दिवसांत गोवंडी आणि साकीनाका पोलिस ठाण्यात हजर राहणार होती. पण ती आजच हजर राहणार आहे.

शेवाळेंविरोधात राजकारण तापण्याची शक्यता आहे.जामिनीमुळे दोन वर्षानंतर पहिल्यांदाच ही तरुणी मुंबईत येणार असल्याने शेवाळेंची झोप उडाली आहे. तर दुसरीकडे ही तरुणी काही मंडळींना भेटण्याची शक्यता नाकारता येत नाही. ती मंडळी विरोधक असण्याची शक्यता आहे.

पुण्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या ॲड.रूपाली पाटील यांनी शेवाळेंविरोधात राजकारण तापवले होते. शेवाळेंच्या अडचणी वाढवत आहेत, याकडेही लक्ष राहणार आहे. शेवाळे पुन्हा कोंडीत सापडतील की नाही, हे लवकरच समजेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com