शिवसैनिक राणांची पाठ सोडेनात! घर, पोलिस स्टेशन, न्यायालय, कारागृह जिथे तिथे निदर्शन

Shivsena | Ravi Rana | Navneet Rana : संतप्त शिवसैनिकांची निदर्शन सुरुच
Navneet Rana | Ravi Rana
Navneet Rana | Ravi RanaSarkarnama

मुंबई : 'मातोश्री' (Matoshri) विरोधात पंगा घेणाऱ्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) या राणा दाम्पत्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. त्यांच्यावर १५३ अ अंतर्गत समाजात तेढ निर्माण होईल असं वर्तन करणे आणि राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल हाय होल्टेज ड्राम्यानंतर खार पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. एक रात्र पोलिस स्टेशनमध्ये काढल्यानंतर आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.

या सर्व घडामोडी एका बाजूला घडत असताना शिवसैनिकांनी (Shivsena) अजूनही राणा दाम्पत्यांची पाठ सोडलेली नाही. आज रवी राणा यांना तळोजा कार्यक्रमात आणलं जाणार आहे. मात्र रवी राणांच्याही आधी तळोजा कारागृहाबाहेर शिवसैनिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी जमलेली आहे. संतप्त शिवसैनिकांकडून अजूनही रवी राणा आणि नवनीत राणांविरोधात जोरदार घोषणा दिल्या जात आहेत.

Navneet Rana | Ravi Rana
PM मोदींच्या पुरस्काराकडे CM ठाकरेंची पाठ; शिवसैनिकांसाठी घेतला निर्णय

शुक्रवार आणि शनिवार राणांच्या अमरावती येथील घराबाहेर शिवसैनिकांनी गर्दी करत निदर्शन केली होती. त्यानंतर शुक्रवारी ते अमरावीमधील शिवसैनिकांना गुंगरा देवून त्यांच्या मुंबईतील खार येथील घरात दाखल झाले. त्यानंतर युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी तिथेही निदर्शन सुरु केली. त्यांना दोन दिवस घरातून बाहेरच पडून दिले नव्हते. त्यानंतर राणा यांना घराबाहेर काढत खार पोलिस स्टेशनला नेण्यात आले, तिथेही शिवसैनिक घोषणा देत अगदी काही क्षणात दाखल झाले. त्यावेळीही शिवसैनिकांनी निदर्शन केली.

Navneet Rana | Ravi Rana
नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमाला न जाता ठाकरे कुटुंबीय घेणार एका 'खास' व्यक्तीची भेट!

काल अटक केल्यानंतर राणा दाम्पत्याला आज वांद्रे न्यायालयात हजर करण्यात आले. तिथेही शिवसैनिक राणा दाम्पत्यांच्या आधी निदर्शनासाठी दाखल झाले. न्यायालयाबाहेर शिवसैनिकांनी राणा दाम्पत्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. आता कारागृहाबाहेरही शिवसैनिक जमा झाले आहेत. त्यामुळे एकूणच घर, पोलिस स्टेशन, न्यायालय आणि आता कारागृह जिथे तिथे शिवसैनिक पोहचत असून त्यांनी राणा दाम्पत्याची पाठ सोडलेली नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com