Pradip Kurulkar news: गोपनीय माहिती पाकिस्तानला कशी पुरवली..? रॉ'च्या चौकशीत कुरुळकरांचे धक्कादायक खुलासे

National News | सप्टेंबर २०२२ पासून कुरुळकर पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांच्या संपर्कात होते.
DRDO Officer Arrest In Pune : Pradip Kurulkar
DRDO Officer Arrest In Pune : Pradip KurulkarSarkarnama

Pradip Kurulkar Latest news Update: पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपाप्रकरणी दहशतवादविरोधी पथकाने (ATS) डीआरडीओ'चे संचालक प्रदीप कुरुळकर (Pradip Kurulkar) यांना अटक करत त्यांचे निलंबन केले. यानंतर आता या प्रकरणी आणखी एक अपडेट समोर आली आहे. आता प्रदीप कुरुळकर यांची गुप्तचर यंत्रणेकडून (रिसर्च अँड ॲनॅलिसिस विंग- रॉ) चौकशी सुरू करण्यात आली आहे. (Shocking revelations of Pradeep Kurulkar in the investigation by RAW)

परदेशात जाऊन कुरुळकर (Pradip Kurulkar) पाकिस्तान हेरांना भेटले होते. त्यांनी हेरांना नेमकी कोणती माहिती दिली. पाकिस्तानी हनी ट्रॅपमध्ये ते कसे अडकले, यासंदर्भात सर्व माहिती कुरुळकर यांच्याकडून ‘राॅ’च्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे.

DRDO Officer Arrest In Pune : Pradip Kurulkar
Prashant Navgire Join BRS : 'बीआरएस'चा आता मनसेला जोर का झटका; राज ठाकरेंचा अत्यंत विश्वासू शिलेदार गळाला

मिळालेल्या माहितीनुसार, सप्टेंबर २०२२ पासून कुरुळकर पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांच्या संपर्कात होते. गुप्तचर यंत्रणांनी टाकलेल्या हनी ट्रॅपच्या जाळ्यात कुरुळकर अडकले. त्यांच्या हालचाली आणि वर्तन संशयास्पद वाटल्या. जानेवारी महिन्यात त्यांचा लॅपटॉप आणि मोबाईलही जप्त करण्यात आला. त्यानंतर हे प्रकरण डीआरडीओच्या एका समितीकडे चौकशीसाठी पाठवण्यात आले. चौकशी समितीने केलेल्या चौकशीत कुरुळकर दोषी आढळून आले. (National News)

तसेच, हनी ट्रॅपमध्ये अडकल्यानंतर कुरुळकरांनी परदेशात पाकिस्तानी हेरांच्या भेटी कशा आणि केव्हा घेतल्या, याचाही आता तपास सुरु कऱण्यात आला आहे. इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांच्या माध्यमातून कुरुळकरांनी पाकिस्तानी इंटेलिजन्स ऑपरेटिव्ह (पीआयओ) गुप्तचर यंत्रणेला कार्यालयीन गोपनीय माहिती पुरवल्याचेही तपासात आढळून आले आहे. धक्कादायक म्हणजे फक्त आर्थिक फायद्यासाठी त्यांनी ही शासकीय गोपनीय माहिती पुरवल्याचही सांगण्यात येत आहे.आतापर्यंत झालेल्या तपास आणि चौकशीनंतर मुंबईतील एटीएसच्या काळा चौकी पोलीस कुरुळकर यांच्याविरोधात शासकीय गुपिते उघड उघड केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By- Anurdha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com