जुई जाधव-
Sansad Ratna Award Winners : 17 व्या लोकसभेतील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी 5 सदस्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. दरवर्षी संसदरत्न पुरस्कार प्रदान केला जातो. संसद महारत्न पुरस्कार हा दर पाच वर्षांतून एकदा दिला जातो. केंद्रीय मंत्री, निवडणूक आयोगाचे माजी आयुक्त यांसारखे अनेक सदस्यांकडून पुरस्कारासाठी नावांची शिफारस केली जाते. महाराष्ट्रातून अनेक दिग्गजांची नावे यात आहेत.
महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे, शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह भाजपचे सुकांत मजूमदार, भाजपचे सुधीर गुप्ता आणि काँग्रेसचे कुलदीप राय शर्मा यांची पुरस्कारासाठी संबंधित समिती निवड जाहीर केली आहे.
भारतातील सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या संसद सदस्यांना हा पुरस्कार नागरी समाजाकडून दिला जाणारा एकमेव पुरस्कार आहे. फेब्रुवारी महिन्यात 17 तारखेला हा पुरस्कार देण्यात येणार आहे. ज्यांना पुरस्कार मिळाले आहेत, त्यांची निवड संसदेत उपस्थित केलेल्या प्रश्नांवर आधारित करण्यात येते.
कोणाला संसद महारत्न पुरस्कार मिळणार?
संसदरत्न पुरस्कार समितीचे अध्यक्ष आणि प्राइम पॉइंट फाऊंडेशनच्या विश्वस्त सचिव प्रियदर्शनी राहुल यांनी सांगितले की, एनके प्रेमचंद्रन (आरएसपी, केरळ), अधीर रंजन चौधरी (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, पश्चिम बंगाल), विद्युत बरन महतो (भाजप, झारखंड) आणि हीना विजयकुमार गावित (भाजप, महाराष्ट्र) यांची संपूर्ण 17 व्या लोकसभेसाठी संसद महारत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
या खासदारांना सलग दुसऱ्यांदा हा पुरस्कार
मागील 16 व्या लोकसभा संसद महारत्न पुरस्कार विजेत्या सुप्रिया सुळे (NCP, महाराष्ट्र), श्रीरंग अप्पा बारणे (शिवसेना, महाराष्ट्र) आणि भर्त्रीहरी महताब (BJD, Odisha) यांची यंदाही सन्मान करण्यात येणार आहे. त्यांना संसद उत्कृष्ट मानरत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. ते पुढे म्हणाले की, सर्व पुरस्कार विजेत्यांची निवड ज्युरी समितीने पारदर्शक पद्धतीने केली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
1999 या वर्षात स्थापन झालेल्या प्राईम पॉइंट फाउंडेशन या एनजीओला डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी संसदरत्न पुरस्काराबाबत सूचना केल्या होत्या. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या सांगण्यावरून 2010 पासून लोकसभेतील आणि राज्यसभेतील सदस्यांना त्यांच्या उत्तम कामगिरीबद्दल संसदरत्न पुरस्कार देण्यात येतो. दरवर्षी संसदरत्न पुरस्कार प्रदान केला जातो. तर संसद महारत्न पुरस्कार दर पाच वर्षातून एकदा दिला जातो. केंद्रीय मंत्री, निवडणूक आयोगाचे माजी सहसंचालक यांसारखे अनेक सदस्य या पुरस्कारासाठी नावांची शिफारस करत असतात. हा एक प्रकारचा नागरी सन्मान समजला जातो. लोकसभा आणि राज्यसभा यातील कामकाजामध्ये घेतलेला सहभाग, उपस्थित केलेले प्रश्न, मांडलेले प्रस्ताव, संसदेतील उपस्थिती आणि एकूण कामगिरीबद्दल हे पुरस्कार दिले जातात. त्यामुळे हे पुरस्कार अत्यंत महत्त्वाचे मानले जातात.
edited by sachin fulpagare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.