Lok Sabha 2024 : चव्हाणांच्या मध्यस्थीने श्रीकांत शिंदेंचा भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद

Shikant Shinde, Ravindra Chavan : आपापल्या पक्षाच्या नेत्यांचा जयघोष करण्यापेक्षा महायुतीचा विजय असो, असे म्हणण्याचे चव्हाणांचे आवाहन
Mahayuti Meeting at Diva
Mahayuti Meeting at DivaSarkarnama
Published on
Updated on

Kalyan Political News : कल्याण लोकसभा मतदारसंघावरून भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) पक्षात हेवे-दावे सुरू आहेत. त्यातच आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) प्रकरणानंतर उभय पक्षांतील दरी वाढल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजप पदाधिकाऱ्यांत संवाद घडवून आणणे क्रमप्राप्त होते. ही बाब लक्षात घेऊन दिव्यातील भाजप पदाधिकाऱ्यांतील नाराजी सूर दूर करण्यात आला. Lok Sabha 2024

कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण (Ravidra Chavan) यांच्या नेतृत्वखाली खासदार श्रीकांत शिंदे आणि भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत मंत्री चव्हाण आणि खासदार शिंदे यांच्यासह दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी संवाद साधत भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी, आपल्या पार्टीबद्दल आपल्याला अभिमान असला पाहिजे. मात्र घोषणा देत असताना महायुतीचा विजय म्हणा, असे आवाहन केले.

Mahayuti Meeting at Diva
MNS- BJP Alliance News : राज ठाकरे आता कुणाची मुलं अंगा-खांद्यावर खेळवणार?

काय म्हणाले चव्हाण...

महायुतीत अजून एक पक्ष येणार आहे. सर्व पक्ष एकत्र येतील त्यावेळेला इथे असणारे सर्वच कार्यकर्ते पदाधिकारी आपल्या पक्षाचे नेते आले की त्यांचा जयघोष करतील. प्रत्येकाला आपपल्या पक्षाचा अभिमान वाटतो. त्यामुळे वैयक्तिक घोषणाबाजी करून आपल्याला वातावरण खराब होईल तसे काही करू नका, असे आवाहन चव्हाण यांनी केले. यंदा या मतदारसंघात गेल्या निवडणुकीपेक्षा जास्त मतांनी खासदार श्रीकांत शिंदेंना (Shrikant Shinde) निवडून आणायचे आहे, हे लक्षात ठेवा, असेही ते म्हणाले.

राज्यात महायुतीचे 45 प्लस लक्ष्य आहे. ते पूर्ण करण्यासाठी कल्याणची जागाही महत्त्वाची आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा प्रचार करायला नको, असे म्हणणारे काही कार्यकर्ते आहेत. तेच प्रचारात कुठेतरी शिरून भाजपचा (BJP) विजय असो असे काय म्हणायचे ते म्हणतात. मात्र आपल्याला एकत्र काम करायचे आहे. त्यासाठी आपले एकच लक्ष असावे, ते म्हणजे नरेंद्र मोदींना पंतप्रधान करणे. मोदींच्या विजयासाठी आपण आपली सर्व दुखणी बाजूला ठेवून काम करणे गरजेचे आहे. त्यासाठी फक्त महायुतीचा विजय असो, असेच म्हटले पाहिजे.

(Edited by Sunil Dhumal)

Mahayuti Meeting at Diva
Lok Sabha Election 2024 : रामटेकच्या गडावर मतदारांची 'कृपा' कुणावर? तुमानेंवर मतदार नाराज , शिंदे घेणार का 'गॅरंटी'?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com