सिंधूताई म्हणाल्या, 'बाळा, उद्धवा महाराष्ट्र तुझ्या खांद्यावर उभा आहे'

सिंधुताईंच्या निधनानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) आणि सिंधूताईंचा (Sindhutai Sapkal) एक संभाषण प्रंचड व्हायरल होत आहे
Conversation between Uddhav Thackeray and Sundhutai Sapkal

Conversation between Uddhav Thackeray and Sundhutai Sapkal

Sarkarnama 

पुणे : अनाथांची माय म्हणून ओळख असलेल्या ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांचे पुण्यातील गॅलक्झी हॉस्पिटलमध्ये मंगळवारी (ता. ४ जानेवारी) रात्री सव्वा आठच्या सुमारास हृदयविकाराने निधन झाले. त्या ७५ वर्षांच्या होत्या. गॅलेक्सी हॉस्पिटल येथे हृदयविकाराच्या (Heart attack) झटक्याने निधन झाल्याची महिती डॉ. शैलेश पुणतांबेकर यांनी दिली.

सिंधुताईंच्या निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्रावर (Maharashtra) शोककळा पसरली आहे. त्यांच्या अनेक आठवणी शेअर सोशल मीडियावर शेअर केल्या जात आहेत. अशीच एक आठवण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांच्याबद्दलही आहे. राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात महाविकास आघाडीचे सरकारस स्थापन झाल्यानंतर काही दिवसातच राज्यावर कोरोना महामारीचे संकट कोसळले. महाराष्ट्रात करोनाच्या संकटाशी उद्धव ठाकरे ज्या प्रकारे लढत आहेत ते पाहून सिंधुताईंनी ९ एप्रिल २०२० रोजी फोनवरुन त्यांचं कौतुक केलं होतं. (Conversation between Uddhav Thackeray and Sundhutai Sapkal)

<div class="paragraphs"><p>Conversation between Uddhav Thackeray and Sundhutai Sapkal</p></div>
सहकार विभागाच्या कारवाईआधीच दरेकरांनी दिला पदाचा राजीनामा

उद्धव ठाकरेंचे कौतुक करत त्यांनी उद्धव ठाकरेंना शाबासकीदेखील दिली होती. ‘बेटा उद्धवा तुझ्याइतका सिंपका सिंपल मुख्यमंत्री पाहिला नाही. जराही बदल नाही तुझ्यात!’. उद्धवा, तुझ्यात बाळासाहेबांचं रक्त आहे, तू खंबीरपणे उभा राहिलास, लढलास, लेकरा तुझ्यात खरं बाळासाहेबांचं रक्त आहे. महाराष्ट्राचं रक्त इतकं खंबीर असू शकतं..केवढी आव्हानं रे तुझ्यासमोर, पण तरीही समर्थपणे तू पुढे चालला आहेस, असं यावेळी सिंधुताईंनी उद्धव यांना उद्देशून म्हटलं होतं. हा सिंधूताईंचा हाच संवाद पुन्हा एकदा व्हायरल होत आहे.

दरम्यान सिंधूताईंच्य निधनानंतर, सीएमओ महाराष्ट्र या ट्विटर अकाऊंट वरुनही त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. सिंधुताईंच्या निधनाची बातमी धक्कादायक आहे. आईच्या ममतेनं हजारो अनाथांचा सांभाळ करणारी ती मातृदेवताच होती. त्यांच्या अचानक जाण्यानं समाजसेवेतील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आपल्यातून हरपले आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री सिंधुताईंना भावपूर्ण श्रद्धांजली. असे ट्विट करण्यात आले आहे.

कोण होत्या सिंधूताई सपकाळ?

सिंधुताई सपकाळ यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९४७ रोजी महाराष्ट्रातील वर्धा येथे झाला होता. त्यांनी पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण गावात ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली होती. त्या संस्थेच्या माध्यमातून त्या अनाथ मुलांना सांभाळत असत. संस्थेत मुलांना सर्व प्रकारचे शिक्षण दिले जाते. शिक्षण पूर्ण झाल्यावर येथील मुले आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतील, यासाठीही त्यांचे प्रयत्न असायचे. अनाथ आणि बेवारस मुलांना आधार देण्याचे फार मोठे काम सिंधुताई यांनी आपल्या जीवनात केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com