पुणे : कोरोनाने देशात पुन्हा आपलं रौद्र रुप दाखवायला सुरुवात केली आहे. अनेक सेलिब्रिटी सध्या करोना पॉझिटिव्ह आहेत. ते घरात उपचार घेत आहेत. यात हृतिक रोशनची पूर्वाश्रमिची पत्नी सुजान खान, जॉन अब्राहम, प्रेम चोप्रा, नोरा फतेही, एकता कपूर, दृष्टी धामी यांच्यासह अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींचा समावेश आहे. दिग्गज गायिका लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना तातडीने मुंबईतील ब्रीच कॅंडी (Breach candy) रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु करण्यात आले आहेत. त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत.
त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. प्रतीत समदानी यांनी दिली आहे. लतादीदींना कोरोना संसर्ग याबरोबरच न्यूमोनिया झाल्याचे निदान झाले आहे. त्यांच्यावर कोरोना आणि न्युमोनिया या दोन्हींवर त्यांचावर उपचार सुरू आहेत. लता दीदींचे वय लक्षात घेता त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. त्या उपचारांना व्यवस्थित प्रतिसाद देत आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती डॉ. प्रतीत समदानी यांनी दिली आहे.
''लतादीदींवर अजून दहा ते बारा दिवस उपचार करण्यात येणार असल्याने त्यांना रुग्णालयात ठेवावे लागेल. त्यानंतरच पूर्ण तपासणी करून घरी सोडण्यात येईल,'' असे त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. समदानी यांनी सांगितले.
लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या प्रकृतीमध्ये सुधार व्हावा, या प्रार्थनेसह वाळूशिल्पकार Sudarsan Pattnaik यांनी पुरी बीचवर खास शिल्प साकारलं आहे. अनेक चाहत्याकडून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करण्यात येत आहे. लतादीदी या सोशल मीडियावर सक्रिय असतात.
“लता मंगेशकर यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, मात्र त्यांची प्रकृती चांगली आहे. त्यांना सौम्य लक्षणं असून ऑक्सिजनची गरज भासणार नाही. त्या आपल्या घरी विलगीकरणात किंवा ब्रीच कॅण्डी रुग्णालयात थांबून उपचार घेऊ शकतात”, असे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.
अनेक राजकीय नेते, मंत्री यांना कोरोनाची लागण झाली आहे. मंगळवारी भाजपचे नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण झाली. गडकरी (nitin gadkari) यांनी मंगळवारी रात्री टि्वट करीत ही माहिती दिली. सोमवारी भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा (jp nadda) आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझीटिव्ह आला आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावनसाहेब दानवे, माजी मंत्री गिरीश महाजन यांना कोरोनाची लागण झाली आहे. ते डॉक्टरांच्या सल्लाने ते घरी उपचार घेत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.