"...तर सरकारमधून पायउतार व्हा" : महाविकास आघाडीविरोधात अण्णा हजारे पुन्हा आक्रमक

Anna Hajare | आंदोलन उभे करण्याचाही इशारा
anna hajare
anna hajareSarkarnama

मुंबई : लोकायुक्त कायद्याच्या मुद्यावरुन जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) पुन्हा एकदा आक्रमक झाले असून त्यांनी "कायदा करा, अन्यथा सरकारमधून पायउतार व्हा" अशी महाविकास आघाडी सरकारकडे (Mahavikas aaghadi) मागणी केली आहे. तसेच हा कायदा न झाल्यास त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यासाठी राज्यातील ३५ जिल्ह्यात आमची कमिटी तयार झाली असल्याची माहितीही त्यांनी दिली.

अण्णा हजारे यांनी आज माध्यमांशी बोलताना महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, लोकायुक्त कायदा तयार करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या काळात आश्वासन दिले होते. देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकायुक्त कायदा बनविण्याचे लेखी आश्वासन दिले होते. त्या अनुषंगाने सात बैठकाही पार पडल्या होत्या.मात्र, अडीच वर्षे उलटून देखील त्यावर काहीच झालेले नाही, उद्धव ठाकरे यावर बोलण्यास तयार नाहीत अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

anna hajare
केतकी चितळे विरोधात शिवसेनेनेही बाह्या सरसावल्या!

सरकारच्या या उदासिनतेविरोधात पुन्हा एकदा राज्यात मोठं जनआंदोलन करण्याची गरज आहे, त्यासाठी राज्यातील ३५ जिल्ह्यात आमची कमिटी तयार झाली असल्याचेही अण्णा हजारे यांनी सांगितले. यावेळी बोलताना अण्णा हजारे यांनी आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्यावरही नाराजी व्यक्त केली. अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाची दोन राज्यात सत्ता आली. पण त्या राज्यात लोकायुक्त कायदा तयार करण्यात आला नाही, याचे दु:ख वाटत असल्याचे अण्णा हजारे म्हणले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com