Solapur News : फटाका फॅक्टरीच्या आगीचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्याचा ACB कडून 'स्फोट'

Solapur News : सोलापूर ग्रामीण पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
File Photo Of Bribe
File Photo Of BribeSarkarnama

सोलापूर जिल्ह्यातील पांगरीच्या जवळील शिराळे गावात एक जानेवारी रोजी फटाका फॅक्टरीच्या कारखान्याला (solapur fireworks factory blast)आग लागली होती, या आगीत पाच महिला कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. इंडियन फायरवर्क्स या फटाका फॅक्टरीत झालेल्या स्फोटाचा तपास पांगरी पोलिस ठाण्याचे पोलिस करीत आहे.

या तपासात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास ज्या अधिकाऱ्याकडे होता त्या अधिकाऱ्याला लाच घेताना एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. एसीबीच्या कारवाईमुळे सोलापूर ग्रामीण पोलीस दलात खळबळ उडाली आहे.पांगरी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक निरीक्षक नागनाथ खुणे हे एसीबीच्या कचाट्यात अडकले आहेत.

File Photo Of Bribe
Hasan Mushrif News : सलग पाच वेळा निवडून आलेले हसन मुश्रीफ ED च्या रडारवर कसे आले ? ; ही आहे भाजपची खेळी

पांगरी पोलीस ठाण्यात युसूफ मणियार आणि नाना पाटेकर या दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्याचा तपास सुरू असताना पांगरी पोलीस ठाण्याच्या आवारात एसीबीने १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पांगरी पोलीस ठाण्याच्या प्रभारी पोलीस अधिकाऱ्यास अटक केली आहे. त्याच बरोबर,पांगरी पोलिस ठाण्यातील एक पोलीस कर्मचारी आणि बाहेरील बाजूस असलेल्या एका कँटीन चालकास अटक झाली आहे.

File Photo Of Bribe
Hasan Mushrif News : सलग पाच वेळा निवडून आलेले हसन मुश्रीफ ED च्या रडारवर कसे आले ? ; ही आहे भाजपची खेळी

पांगरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे, कॉन्स्टेबल सुनील बोदमवाड,कँटीन चालक हसन इस्माईल सय्यद या तिघांवर एसीबीने गुन्हा दाखल करून कारवाई केली आहे.पोलीस ठाण्यात जाऊन लाच देण्याची रक्कम ठरवली जात होती.

पीडित व्यक्तीना बाहेरील कँटीनमध्ये लाचेची रक्कम द्यावी लागत होती.सापळा रचून ही कारवाई करण्यात आली आहे. पांगरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नागनाथ खुणे, कॉन्स्टेबल सुनील बोदमवाड,कँटीन चालक हसन इस्माईल सय्यद या तिघांवर एसीबीने गुन्हा दाखल केला आहे.

पांगरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या फटाका फॅक्टरी स्फोट प्रकरणात दोन जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये युसूफ मणियार हा पोलिसांच्या ताब्यात आहे. तर, मुख्य संशयित आरोपी नाना पाटेकर हा,अद्यापही फरार आहे. याचा तपास सुरू असताना पांगरी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक निरीक्षक नागनाथ खुणे हे एसीबीच्या कचाट्यात अडकले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com