Mla Disqualification Case : अर्जामागून अर्ज; नार्वेकरांनी ठाकरे गटाला फटकारले, शिंदे गटाला मात्र मुदतवाढ

Rahul Narwekar On Mla Disqualification Case : सर्वोच्च न्यायालयाने तंबी दिल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज आमदार अपात्रतेप्रकरणी सुनावणी घेतली....
Eknath Shinde, Rahul Narwekar, Uddhav Thackeray
Eknath Shinde, Rahul Narwekar, Uddhav Thackeray Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics News : शिवसेनेच्या आमदार अपात्रतेप्रकरणी आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुनावणी घेतली. या सुनावणीत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाला कागदपत्र सादर करण्यासाठी २५ ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली आहे.

Eknath Shinde, Rahul Narwekar, Uddhav Thackeray
Rahul Narvekar Delhi Visit : राहुल नार्वेकर आज पुन्हा दिल्ली दौऱ्यावर

विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गटाला कागदपत्र सादर करण्यासाठी ५ दिवसांची मुदत दिली आहे. आता या प्रकरणी पुढील सुनावणी ही २६ ऑक्टोबरला होणार आहे. तसेच ६ याचिकांमध्ये ३४ याचिकांचा समावेश करण्याचा निर्णय आज घेण्यात आला.

मुख्यमंत्र्यांच्या विश्वासदर्शक ठरावावेळी झालेलं व्हिपचं उल्लंघन, इतर बैठकांना अनुपस्थित राहणं आणि अपक्ष आमदारांच्या संदर्भात ठरावावर केलेल्या सह्या, अशा प्रकारे ढोबळ वर्गवारी करण्यात आली आहे. यानुसार पुढील काळात सुनावणी घेण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती शिंदे गटाच्या वकिलांकडून माध्यमांना देण्यात दिली.

उद्धव ठाकरे गटाच्या वतीने पुन्हा अर्ज करण्यात आले. यावर विधानसभा अध्यक्षांनी नाराजी व्यक्त करत ठाकरे गटाला फटकारलं. तुम्ही अर्जामागून अर्ज देता. त्यामुळे ही प्रक्रिया लांबू शकते, असं अध्यक्ष म्हणाले. ही प्रक्रिया पूर्ण व्हावी, अशी तुमची इच्छा असेल तर इतके अर्ज वारंवार देण्याची गरज नाही. त्यामुळे आपण ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करूया. सर्वोच्च न्यायालयात सादर केलेली कागदपत्रे माझ्यासमोर सादर करा, अशी सूचना विधानसभा अध्यक्षांनी ठाकरे गटाला केली.

सर्वोच न्यायालयासमोरची याचिका पूर्णपणे वेगळी आहे. आणि इथे ज्या याचिका आहेत त्या आमदार अपात्रते प्रकरणाच्या संदर्भातल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या याचिकांचा इथल्या सुनावणीशी काहीही संबंध येत नाही. त्यामुळे दोन्ही बाजूंनी आपली कागदत्रं आणि पुरावे सादर करावी. कारण हा लवाद आहे, असं अध्यक्षांनी स्पष्ट केलं.

Eknath Shinde, Rahul Narwekar, Uddhav Thackeray
Nabam Rebia Case : ठाकरे गटाच्या पदरी प्रतीक्षाच; 'नबाम रेबिया'प्रकरणी सुनावणी थेट पुढच्या वर्षी!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com