मोठी बातमी : एसटीचे आणखी ५४२ कर्मचारी निलंबित

एसटी महामंडळाकडून (ST) निलंबन करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या 918 वर पोचली आहे.
MSRTC (S.T)
MSRTC (S.T)Sarkarnama

पुणे : राज्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी (ST Workers Strike) कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या व प्रलंबित मागण्यांच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. हे आंदोलन थांबावे व एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रूजू व्हावे, असे राज्य सरकारकडून (State Government) वेळोवेळी आवाहन करण्यात येत आहे. मात्र, एसटी कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.

यामुळे एसटी वाहतुक सेवा ठप्प झाली आहे. ऐन दिवाळीच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना याचा फटका बसत आहे. यामुळे आता राज्य सरकारने देखील कडक भूमिका घेत, राज्यभरातील काल (ता.9 नोव्हेंबर) ३७६ एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित केले तर, आज (ता.10 नोव्हेंबर) पुन्हा 63 आगारातील 542 एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यामुळे आता हा संप अजूनच चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

MSRTC (S.T)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कळकळीचे आवाहन

आज (ता.10 नोव्हेंबर) करण्यात आलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या निलंबनाच्या कारवाईमध्ये एकुण 542 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने आता निलंबन करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या 918 वर पोचली आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पाठीमागे घ्यावे आणि कामावर रूजू व्हावे असे आवाहन राज्याचे मुख्यमंंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांंनी आज (ता.10 नोव्हेंबर) दुपारी केले होते. मात्र, एसटी कामगार त्यांच्या भूमिकेवर ठाम असल्याने महामंडळाकडून सलग दुसऱ्या दिवशीही कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. आता या आंदोलनात विरोधी पक्ष असलेल्या भाजपने सुद्धा उडी घेतल्याने आता हे आंदोलन आणखीनच चिघळण्याची चिंन्हे दिसत आहेत.

MSRTC (S.T)
सरकारच्या दबावामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटणार? अनिल परबांसोबत बैठक

आज करण्यात आलेल्या निलंबनाच्या कारवाईमध्ये नागपूर विभागातील कटोल, रामटेक, इमामवाडा, गणेशपेठ, घाटरोड आगारातील 46 कर्मचारी, वर्धा विभागातील तळेगाव आगारातील 10 कर्मचारी, भंडारा विभागातील पवणी, साकोला, भंडारा आभारातील 30, चंद्रपुर विभागातील चिमुर वरोरा आगारातील 15, अकोला विभागातील रिसोड, मंगरूळरपीर आगारातील 20, बुलढाणा विभागातील चिखली, मेहकर, खामगाव आगारातील 34, यवतमाळ विभागातील नेर, वणी, उमरखेड, पुसद आगारातील 46, अमरावती विभागातील परतवाडा, चांदुररेल्वे, बडनेरा आगारातील 20, औरंगाबाद विभागातील 10, बीड विभागातील बीड, पाटोदा, गेवराई, धारूर आगारातील 22, उस्मानाबाद विभागातील भुम, तुळजापुर, कळंब, परांडा, उस्मानाबाद, उमरगा आगारातील 36, परभणी विभागातील वसमत, कळमनुरी, परभणी, गंगाखेंड जिंतुर आगारातील 25, नाशिक विभागातील नांदगाव, पेठ, मालेगाव, कळवण आगारातील 40, अहमदनगर विभागातील जामखेड, श्रीगोंदा, नेवासा आगारीतील 20, जळगाव विभागातील एरंडोल, यावल, जळगाव आगारातील 28, पुणे विभागातील राजगुरूनगर, इंदापुर, नाराय़णगाव, विकाशा, बारामती आगारातील 26, सांगली विभागातील इस्लामपुर, आटपाटी आगारातील 58, सातारा विभागातील फलटण आगारातील 2, सोलापुर विभागातील मंगळवेढा, अक्कलकोट, सोलापुर आगारातील 35 तर, रायगड विभागातील कर्जत, श्रीवर्धन, अलिबाग व मुरूड आगारातील 19 कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com