मोठी बातमी; राज्यातील 92 नगरपरिषदा अन् 4 नगरपंचायतीच्या निवडणुका स्थगित

State Election Commission : आचारसंहिता देखील मागे
State Election Commission Latest News
State Election Commission Latest NewsSarkarnama

मुंबई : राज्यातील 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रमाला स्थगित देण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने याबाबतची घोषणा केली आहे. आयोगाचे सचिव संजय सावंत यांनी आज एका पत्राद्वारे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतची माहिती कळवली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर आयोगाने भूमिका स्पष्ट केली आहे. शिवाय या सर्व ठिकाणी लागू करण्यात आलेली आचारसंहिता देखील मागे घेण्यात आली आहे. सुधारित निवडणूक कार्यक्रम लवकरच जाहीर होणार असल्याचेही आयोगाकडून सांगण्यात आले आहे. (state election commission stay on maharashtra nagarparishd and nagar panchayat election)

8 जुलै रोजी राज्यातील 17 जिल्ह्यातील 92 नगरपरिषदा व 4 नगरपंचायतीच्या सदस्यपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल करण्यात आली होती आणि 12 जुलै रोजी त्याची सुनावणी झाली. त्यावेळी शासनाने समर्पित आयोगाने नागरिकांच्या मागास प्रवर्गाबाबत दिलेला अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला.

सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भातील पुढील सुनावणी 19 जुलै रोजी ठेवलेली आहे. या पार्श्वभूमीच्या अनुषंगाने 8 जुलै रोजीच्या आदेशान्वये देण्यात आलेला राज्यातील 92 नगरपरिषदा व चार नगरपंचायतीमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे. सदर निवडणुकांसाठी सुधारित निवडणूक कार्यक्रम यथावकाश देण्यात येईल. असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

राज्यातील प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऐन पावसाळ्यात घेता येणे शक्य नसल्याचे राज्य निवडणूक आयोगाकडून (Election Commission) सर्वोच्च न्यायालयात सांगण्यात आले होते. तसेच सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये दोन टप्प्यात या निवडणुका घेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी आयोगाकडून न्यायालयात करण्यात आली होता. मात्र यावर राज्यात ज्या भागात पाऊस नाही, तिथे निवडणुका घेण्यास काय हरकत आहे, असा प्रश्न न्यायालयाने आयोगाला केला होता. त्यानुसार आयोगाकडून जिल्हानिहाय आढावा घेऊन निवडणूक कार्यक्रम तयार करण्यात आला होता.

या ठिकाणी होणार होत्या निवडणुका...

अ वर्गातील ६ नगरपरिषदा -

 • भुसावळ

 • बारामती

 • बार्शी

 • जालना

 • बीड

 • उस्मानाबाद

ब वर्गातील २८ नगरपरिषदा -

 • मनमाड

 • सिन्नर

 • येवला

 • दौंडाईचा- वरवाडे

 • शिरपूर- वरवाडे

 • शहादा

 • अंमळनेर

 • चाळीसगाव

 • कोपरगाव

 • संगमनेर

 • श्रीरामपूर

 • चाकण

 • दौंड

 • कराड

 • फलटण

 • इस्लामपूर

 • विटा

 • अक्कलकोट

 • पंढरपूर

 • अकलूज

 • जयसिंगपूर

 • कन्नड

 • पैठण

 • अंबेजोगाई

 • माजलगाव

 • परळी-वैजनाथ

 • अहमदपूर

 • अंजनगाव- सुर्जी

क वर्गातील नगरपरिषदा -

 • कुरुंदवाड

 • मुरगुड

 • वडगांव

 • गंगापूर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com