चंद्रकांतदादा अडचणीत! रुपाली चाकणकर 'अॅक्शन मोड'वर

सुप्रिया सुळेंबद्दल बोलताना चंद्रकांत पाटलांची जीभ घसरली
Chandrakant Patil|
Chandrakant Patil|Sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यासंदर्भात बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची जीभ घसरली होती. चंद्रकांत पाटील यांच्या आक्षेपार्ह विधानाची गंभीर दखल राज्य महिला आयोगाने घेतली आहे. या आक्षेपार्ह विधानाबाबत चंद्रकांत पाटील यांना लेखी खुलासा करण्याचे निर्देश राज्य महिला आयोगाने आज दिले. हा खुलासा करण्यासाठी त्यांना दोन दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे.

या प्रकरणी पुणे शहर लीगल सेलचे असीम सरोदे यांच्यासह अन्य काही जणांनी महिला आयोगाकडे धाव घेतली होती. त्यांनी याबाबत लेखी तक्रार केली आहे. याची आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. पाटील यांनी या विधानांबाबत आयोगाकडे दोन दिवसांत लेखी खुलासा करावा, असे निर्देश आयोगाने दिले आहेत. महिला आयोगाचे अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्याकडे आहे.

Chandrakant Patil|
आर्यन खानला क्लिनचिट मिळताच मुकुल रोहतगी म्हणाले...

महिला आज स्वकर्तृत्वाने शिक्षण, व्यवसाय, समाजकारण व राजकारणासह सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य महिलांच्या आत्मसन्मानला ठेच पोचवणारे आहे. यापुढे महिलांचा सन्मान राखला जाईल, याचे भान त्यांनी ठेवावे, असे आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी म्हटले आहे. ओबीसी आरक्षण आंदोलनात चंद्रकात पाटील यांनी सुप्रिया सुळे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते.

Chandrakant Patil|
समीर वानखेडेंना दणका! केंद्रीय गृह मंत्रालयाकडून कारवाईचे आदेश

आमदार पाटील यांनी बुधवारी खासदार सुप्रिया सुळे यांना उद्देशून ‘मसणात जावे’ असे बोलले होते. त्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून चंद्रकांत पाटील यांना त्याच भाषेत उत्तर दिले जात आहे. राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण, सक्षणा सलगर यांनी चंद्रकांत पाटलांचा खरपूस शब्दांत समाचार घेतला होता. तसेच, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यावर भाष्य केले. महाराष्ट्राची ती संस्कृती नाही. आम्ही पण खूप काही बोलू शकतो, पण आपल्या संस्कृतीचा विचार करुन गप्प बसतो, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी चंद्रकांत पाटील यांना सुनावले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com