Maharashtra Budget Session: शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मगरीचे अश्रू थांबवा; फडणवीसांनी विरोधकांना सुनावले

Devendra Fadnavis: मागील सरकारमधील नुकसानीचे पैसे आता दिल्याचाही केला दावा
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama

Maharashtra Politics: विरोधक शेतकऱ्यांच्या बाजुने असते तर मागच्या काळात मदत केली असती. मात्र, त्यांनी शेतकऱ्यांना कोणतीही मदत केली नाही. त्यांच्या काळातील पैसे आम्हाला द्यावे लागले, असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मगरीचे अश्रू रडणे थांबवा अशा शब्दांत विरोधकांना सुनावले.

राज्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी विधानसभेत गोंधळ घातला. यावेळी विरोधकांना उत्तर देताना उपमुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, "किमान शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तरी राजकारण थांबवा. हा राजकारण करण्याचा विषय नाही. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती मागवली आहे. प्राथमिक माहितीनुसार आठ जिल्ह्यांत सुमारे १३ हजार ७२९ हेक्टरवर नुकसान आहे. आणखी अहवाल येत आहेत. मदतीचे प्रस्ताव पाठविण्याचे आदेश सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. आज नुकसान झाले आणि उद्या मदत दिली, असे होत नाही. त्यासाठी पंचनामे करावे लागतात."

Devendra Fadnavis
Maharashtra Budget Session: टोमणे अन् आरोप-प्रत्यारोप करीत महिला आमदारांनी गाजविले सभागृह

फडणवीस उत्तर देत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील (Jayant Patil) आणि इतरांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावर त्यांना सुनावताना फडणवीस म्हणाले, "मला आता बोलायला लावू नका. मागच्या काळात चक्रीवादळ आले त्याचे पैसे अजून दिले नाहीत. कशाला राजकीय बोलायला लावता. हा राजकीय विषय नाही. तुमच्या काळातले अनुदानाचे पैसे आम्ही दिले. सुमारे पाच हजार कोटी रुपये आमच्या सरकारने दिले आहेत."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com