अशा खुनी लोकांना भर चौकात फासावर लटकवलं पाहिजे : संजय राऊत संतापले

Shraddha Walker | Sanjay Raut | आपल्या महाराष्ट्रातील एका मुलीची जशी हत्या झाली ते धक्कादायक आणि दुर्दैवी आहे.
Sanjay Raut
Sanjay RautSarkarnama

Sanjay Raaut : जो परिस्थिती जन्य पुरावा समोर आला आहे तो पाहता अशा खुनी लोकांवर खटले न चालवता त्यांना भर चौकात फासावर लटकवा, अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली आहे. श्रद्धा वालकर (Shraddha Walker case) हत्या प्रकरणी बोलताना त्यांनी संताप व्यक्त केला आहेत. इतकेच नव्हे तर आपल्या मुलींनी सावध वागायला शिकलं पाहिजे असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

आपल्या महाराष्ट्रातील एका मुलीची जशी हत्या झाली ते धक्कादायक आणि दुर्दैवीआहे. समाज माध्यमांवरुन मुला मुलींच्या ओळखी होतात, आणि त्या नात्यांच रुपांतर इतकं भयानक होते. ज्या पद्धतीने त्या मुलीला तुकडे तुकडे करुन मारलंय. त्या मुलीच्या वडीलांची मुलाखत मी आताच वाचली. त्यात तिच्या वडिलांचा आक्रोश मी पाहिला. हा आक्रोश पाहून कुठल्या गुंगीत आणि धुंदीत जगतायेत ते आज परत एकदा कळलं. अशा खुनी लोकांवर खटलेही चालवू नयेत. त्याच्यावर कोणी राजकारण करत असेल तर तेही बंद केलं पाहिजे. जो परिस्थिती जन्य पुरावा समोर आला आहे त्याच्या आधारेच अशा खुनी लोकांना भर चौकात फासावर लटकवलं पाहिजे. असा संताप संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

Sanjay Raut
श्रद्धा वालकर प्रकरण: महिला आयोगाची राष्ट्रीय महिला आयोगाला पत्राद्वारे मोठी मागणी

इतकचं नाही तर, महाराष्ट्रातल्याच नाही तर संपूर्ण देशातल्या मुलींनी सावधपणे जगायला शिकलं पाहिजे, मुलींना असं फसवून जे काही केलं जातयं ती विकृती आहे, विकृतीच्या पुढचं पाऊल आहे. श्रद्धाच्या खुन्याबद्दल जी माहिती समोर येतेय ती थरारक आहे, असही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाणार आहेत. असा सवाल विचारला असता, खंजीर बाजूला ठेवून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जा, अशी विनंती संजय राऊत यांनी केली आहे. बाळासाहेब सर्वांचे आहेत पण आपल्या हातातील खंजीर बाजूला ठेवून तुम्ही बाळासाहेबांचे दर्शन घ्या, असही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com