अशी झाली कर्मचाऱ्यांकडून वसुली; संजय मुंडेंच्या दाव्यांनी खळबळ

ST Sstrike |Gunratrna Sadavarte|पहिल्या टप्प्यात एक लाख दहा हजार रुपये जमा करण्यात आले.
ST Sstrike |Gunratrna Sadavarte|
ST Sstrike |Gunratrna Sadavarte|

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरावर हल्ल्याप्रकरणी 110 एसटी कर्मचाऱ्यांसह वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनाही अटक करण्यात आली. या घटनेने राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणी काही धक्कादायक खुसाले समोर आले आहेत. स्वारगेट डेपोमधील सर्व कर्मचाऱ्यांकडून जवळपास एक लाख दहा हजार इतकी रक्कम गुणरत्न सदावर्ते यांना दिल्याचा खुसाला स्वारगेट आगारातील एसटी कर्मचारी संजय मुंडे यांनी केला आहे. धक्कादायक म्हणजे राज्यातील तब्बल 250 डेपोमधून गुणरत्न सदावर्ते यांनी पैसे घेतल्याचा आरोपही मुंडे यांनी केला आहे.

संजय मुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली नव्हती त्यांच्याकडून प्रत्येकी तीनशे रुपये आणि ज्यांच्यावर कारवाई झाली होती, त्यांच्याकडून प्रत्येकी 540 रुपये आंदोलन काळात गोळा करण्यात आले. जय कुमार गुजर यांच्या सांगण्यावरून आम्ही स्वारगेट आगारातील कर्मचाऱ्यांकडून पैसे गोळा केले. पहिल्या टप्प्यात गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटील यांच्याकडे एक लाख दहा हजार रुपये जमा करण्यात आले.

ST Sstrike |Gunratrna Sadavarte|
सदावर्तेंचा पाय खोलात! मुंबई, साताऱ्यानंतर आता कोल्हापूर पोलिस दाखवणार हिसका

सदावर्ते आणि पाटील यांनी या पैशांचे पुढे काय केले, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. संजय मुंडेंनी सदावर्तेंवर पैसे घेतल्याच्या आरोपांवर आता राजकीय वर्तुळातूनही प्रश्न उपस्थित केले जात आहेत, सजंय राऊत आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सुरुवातीपासूनच एसटी आंदोलनाबाबात सदावर्ते यांच्यावर आरोप केले जात होते. आता संजय मुंडे यांच्या आरोपानंतर हे प्रकरण अधिक तापण्याची शक्यता आहे.

दरम्यान, महामंडळाचे विलिनीकरण व्हावे याला कोर्टाने मान्यता दिली नाही. त्यामुळे पाच महिने कर्मचाऱ्यांचे नुकसान झाले. हे आंदोलन चुकीच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि याला भाजपने समर्थन दिले, याकडे महेश तपासे यांनी लक्ष वेधले आहे. सदावर्ते यांनी कामगारांकडून सुरुवातीला 540आणि नंतर 300 रुपये जमा केले असा युक्तिवाद न्यायालयात करण्यात आला. जवळपास 90 हजार कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतल्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे, जर एवढ्या कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतले असतील तर पैशांचा आकडा फार मोठा होतो. रोखीत पैसे घेतले असतील तर रोख पैसे घेणे हा इन्कमटॅक्सच्या दृष्टीने गुन्हा आहे, असेही महेश तपासे यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com