Shivsena Vs BJP News: ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून हटवण्यासाठी राऊतांकडून जेवढा प्रयत्न झाला, तेवढाचं गडकरींना...

Sudhir Mungantiwar On Sanjay Raut: नितीन गडकरींच्या पराभवासाठी सर्व प्रकारची रसद फडणवीसांनी पुरवली आहे, असे संघाचेच लोक नागपूरात उघडपणे बोलतात. असा मोठा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
Sudhir Mungantiwar, Sanjay Raut
Sudhir Mungantiwar, Sanjay RautSarkarnama

Shivsena Vs BJP News: 4 जूननंतर भाजपमध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा (Narendra Modi and Amit Shaha) यांना पाठिंबा राहणार नाही. नितीन गडकरींचा (Nitin Gadkari) पराभव व्हावा यासाठी मोदी-शहा आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मिळून प्रयत्न केले. मात्र गडकरींचा पराभव होत नाही याची खात्री पटल्यानंतर फडणवीस नाइलाजाने प्रचारात उतरले.

तसेच गडकरींच्या पराभवासाठी सर्व प्रकारची रसद फडणवीसांनी पुरवली आहे, असे संघाचेच लोक नागपूरात उघडपणे बोलतात. असा मोठा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राऊतांच्या याच वक्तव्याचा समाचार आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आहे.

मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) म्हणाले, संजय राऊतांना (Sanjay Raut) खोटं बोलण्याचं व्यसन लागलं आहे. खोटं बोलण्याचीही एक मर्यादा असते परंतु दुर्दैवाने ही सवय आता, व्यसनामध्ये बदलली आहे. रोज उठायचं आणि खोटं बोलायचं आदित्य ठाकरेंना पाडण्याचा प्रयत्न संजय राऊतांकडून झाला, हे जेवढं खरं असेल, उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री पदावरून हटवण्यासाठी संजय राऊतांनी प्रयत्न केला, हे जेवढं खरं असेल, तेवढंचं गडकरींचा पराभव करण्यासाठी मोदी-शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी मिळून प्रयत्न केले हे खरं आहे, असा खोचक टोला त्यांनी राऊतांना लगावला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ते पुढे म्हणाले, नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे देशात सर्वमान्य नेते आहेत, गडकरींनी प्रस्ताव मांडल्यावर सर्व खासदारांनी त्यांचे कौतुक केले. गडकरींच्या पाठीशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा आहेत, म्हणूनच ते हे सर्व करू शकतात. संजय राऊतांते आरोप निराधार आहेत. एकदा टीव्हीवर दिसायची सवय लागली. पेपरात रोज फोटो यावे हे व्यसन जडल्यामुळे असे आरोप होत असतात, मात्र त्यात काहीही तथ्य नसल्याचंही त्यांनी सांगितलं.

इंडिया आघाडीने ठाकरेंना प्रचारासाठी बोलावलं का?

यावेळी बोलताना मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. ते म्हणाले, "राज्यात प्रचारासाठी उद्धव ठाकरेंनी इंडिया आघाडीतील (India Alliance) अनेक नेत्यांना बोलावलं. मात्र, इंडिया आघाडीतील कोणत्या नेत्याने ठाकरेंना देशात प्रचारासाठी बोलावलं का? असा प्रश्न उपस्थित करत, उद्धव ठाकरेंनी या आयुष्यात मोठी चूक केली. मात्र ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना आहे की, त्यांच्याकडून पुढच्या जन्मात चूक अशी होऊ नये."

Sudhir Mungantiwar, Sanjay Raut
Sunil Tatkare News : राज्यात 4 जूननंतर पुन्हा भूकंप? बड्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार, : तटकरेंच्या दाव्याने खळबळ

मोदी-शहा यांचे योगी हे प्रिय नेते आहेत

तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे जनतेसाठी उपयोगी आहेत, अशी कौतुकाची थाप खुद्द पंतप्रधान मोदींनी योगी आदित्यनाथ यांच्या पाठीवर दिली होती. अशा लोकनेत्याला पक्ष का संपवेल? मोदी आणि शहा यांचे योगी हे प्रिय नेते आहेत. आपल्याच पक्षातील लोकप्रिय नेत्यांना संपवण्याचे कृत्य कुणीही करू शकत नाही. अशाच नेत्यांना घेवून मोदी शहा यांना पुढे जायचे आहे. नेते संपवत राहिले तर पुढील वाटचाल कुणाच्या भरवशावर करणार? त्यामुळे अरविंद केजरीवाल यांच्या दाव्यात काहीह तथ्य नसल्याचंही ते यावेळी म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com