Maharashtra Sugar Factory : विधानसभेपूर्वी शिंदे-फडणवीस-पवारांची कारखान्यांतून 'मतपेरणी'

MVA Vs Mahayuti Politics : महायुतीशी संबंधित अनेक नेत्यांचे कारखाने आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्या कारखान्यांना ऊस गाळप हंगाम चालू होण्यापूर्वी दिलासा देण्यात आला आहे.
Mahayuti
MahayutiSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Cooperative Politics : लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला मोठा फटका सहन करावा लागला आहे. त्यानंतर महायुती सरकारने अनेक घोषणा करून विधासनसभेची तयारी सुरू केल्याचे बोलले जाते.

त्यातच आता डबघाईला आलेल्या महायुतीतील अनेक नेत्यांच्या कारखान्यांना आर्थिक बळ देऊन राज्यभरात मतपेरणीचा प्रयत्न सरकारने केल्याचे दिसून येत आहे.

महायुतीशी संबंधित अनेक नेत्यांचे कारखाने आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्या कारखान्यांना ऊस गाळप हंगाम चालू होण्यापूर्वी दिलासा देण्यात आला आहे. राष्ट्रीय सहकार विकास निगम (NCDC) यांच्याकडून मंजूर झालेली 1590 कोटी रुपयाची आर्थिक मदत राज्यातील 11 सहकारी साखर कारखान्यांना वितरित करण्यात आली आहे. विधानसभा निवडणूक तोंडावर असताना सत्ताधाऱ्यांच्या कारखान्यांना मदत केल्याचा आरोप आता होऊ लागला आहे.

या साखर कारखान्यांना Sugar Factory मिळालेले 1590 कोटी रुपये वर्ग करण्याबाबत राज्य सरकारच्या सहकार विभागाचा आदेश जारी झाला आहे. त्यात मुदतीत कर्जाची परतफेड केली तर आहे तेच व्याज भरावे लागणार आहे. अन्यथा लागू केलेल्या व्याजाला 1 टक्के दंडाची आकारणी केली जाणार आहे, असेही आदेशात स्पष्टपणे नमूद केले आहे.

Mahayuti
Amit Bhangre : वडिलांच्या 40 वर्षांच्या संघर्षाचं अमित भांगरे चीज करणार का? शरद पवारांच्या शिलेदाराकडं लक्ष...

'या' 11 साखर कारखान्यांना मिळाली आर्थिक मदत

  • अजित पवार Ajit Pawar गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना 97 कोटी.

  • अजित पवार गटाचे आमदार मकरंद पाटील यांच्या 2 युनिट असलेल्या किसनवीर सहकारी साखर कारखान्यांना 327 + 140 अशी एकूण 467 कोटी.

  • लोकनेते मारुतीराव घुले यांच्या ज्ञानेश्वर साखर कारखाना नेवासा 140 कोटी.

  • अहमदनगर जिल्ह्यातील अगस्ती सहकारी साखर कारखाना 94 कोटी रुपये.

  • अंबाजोगाई येथील सहकारी साखर कारखाना 80 कोटी रुपये

  • अजित पवार यांच्या गटाच्या नेत्या अनुराधा नागवडे यांच्या शिवाजीराव नागवडे श्रीगोंदा 103 कोटी.

  • भाजप समर्थक आमदाराच्या मंगळवेढ्यातील संत दामाजी सहकारी साखर कारखान्याला 94 कोटी.

  • भाजप आमदार मोनिका राजळे Monica Rajale यांच्या वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना पाथर्डी 93 कोटी.

  • माजी आमदार बसवराज पाटील यांच्या विठ्ठल साई साखर कारखान्याला 94 कोटी रुपये.

  • भाजप समर्थक अपक्ष आमदार विनय कोरे यांच्या वारणा सहकारी साखर कारखान्याला 327 कोटी.

Mahayuti
Gunratna Sadavarte: सदावर्तेचं ठरलं, सुप्रीम कोर्टाच्या SC, ST आरक्षणाबाबतच्या निकालालाच देणार आव्हान; उचलणार मोठं पाऊल

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com