Sugarcane Agitation News: पन्हाळा तालुक्यातील दत्त दालमिया या खाजगी साखर कारखान्यात विरोधात ऊसदरासाठी जय शिवराय शेतकरी संघटनेने सोमवारीपासून आंदोलन सुरू केले आहे. दत्त दालमिया शुगर (आसुर्ले पोर्ले) या कारखान्याने एमआरपी पेक्षा पहिली उचल कमी जाहीर करून कारखाना सुरू केलेला आहे. (Kolhapur Latest News)
ऊस दर आंदोलनाला कोल्हापुरात हिंसक वळण लागलं आहे. या आंदोलना दरम्यान कोल्हापुरात ऊस आंदोलनाचा भडका उडाला आहे. पन्हाळा तालुक्यातील दत्त दालमिया कारखान्याची ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर अज्ञातांनी पेटवून दिल्याने खळबळ माजली आहे. ऊसाने भरलेला हा ट्रॅक्टर दालमिया साखर कारखान्याकडे जात होता. यावेळी शिये भुये मार्गावर मध्यरात्री हा ट्रॅक्टर अज्ञातांकडून पेटवण्यात आला.
मागील हंगामातील आरएसएस (महसुली विभागणी) नुसार हिशोब देऊन ती रक्कम शेतकऱ्यांना त्वरित मिळावी, तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील इतर सर्व साखर कारखान्यांपेक्षा तोडणी – वाहतूक खर्चही १२५ ते १५० रुपयांनी ज्यादा दाखवून शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे, असे शेतकऱ्यांचे मत आहे.
यातून त्यांनी मागील गळीत हंगामामध्ये सुमारे १४ कोटी रुपयांची लूट केलेली आहे. आदी मागण्या संदर्भात दत्त दालमिया कारखान्याच्या गेट समोर जय शिवराय किसान संघटनेने वतीने सोमवारपासून आंदोलन सुरू केले आहे. प्रशासनाने सकारात्मक पाऊल उचलले नाही, तर दत्त दालमिया कारखान्याची संपूर्ण ऊस वाहने रोखून धरण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने यांनी दिला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.