Sugarcane Workers News : ऊसतोड कामासाठी दिलेली उचल वसुली करण्यासाठी ऊसतोडणी कामगारांवर अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर कामगारांच्या ऊस तोड कामगारांच्या रोजगारात घट झाल्याने त्यांना आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. असे असताना मात्र शिंदे-फडणवीस सरकार साखर कारखानदारांच्या दबावाखाली पोलिस यंत्रणेच्या माध्यमातून ऊसतोडणी मुकादमाांवर गुन्हे दाखल करत आहे.
या घटनेच्या या निषेधार्थ आणि ऊसतोड कामगारांवर होणाऱ्या अत्याचाराच्या वारंवार घडणाऱ्या घटनांबाबत आयटक प्रणीत लालबावटा ऊसतोडणी कामगार, मुकादम आणि वाहतूकदार युनियनच्या वतीने १२ जून रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती युनियनचे सरचिटणीस राजन क्षीरसागर यांनी दिली.
या संघटनेच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. २०२२-२३ या कालावधीत ऊसाचे एकरी उत्पादनात घट झाल्याचे साखर आयुक्तांनी जाहीर केले आहे. त्याचे गंभीर परिणाम ऊसतोडणी कामगारांना भोगावे लागत आहेत. दिवसभर राबूनही ऊसाचे पुरेसे वजन न भरल्याने ऊसतोडणी कामगारांना संपूर्ण मंजुरी मिळत नाही. या कामगारांच्या मजुरीत घट झाल्याची वस्तुस्थिती आहे, असे क्षीरसागर यांनी सांगितले.
ऊसतोडणी कामगार मुकादम यांच्या प्रमुख मागण्या काय?
- कोल्हापूर पोलिसांनी दाखल केलेले १५० गुन्हे तत्काळ स्थगित करा
- कामगारांना थेट विशेष भत्ता द्यावा
- ऊसतोडणी व स्थलांतरित कामगारांसाठी स्वतंत्र कायदा मंजूर करावा
- मराठवाड्यात ग्रामपंचायतीद्वारे ऊसतोड कामगारांची नोंदणी करावी
- ऊसतोडणी मजुरांवरील थकीत उचल रकमेचे संस्थागत कर्जात रूपांतर करावे
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.