डॉ. आंबेडकर जयंती कार्यक्रमात सहभागासाठी सुजात आंबेडकरांना परवानगी नाकारली...

Sujat Ambedkar : इतर कार्यक्रमांना बाहेरील व्यक्तींच्या उपस्थितीवर निर्बंध घालण्यात येत नाहीत. मात्र, सुजात आंबेडकर यांना परवानगी का नाकारली, असा सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.
Sujat Ambedkar
Sujat AmbedkarSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्स (TISS) या संस्थेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू आणि वंचित बहूजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) युवा नेते सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar) यांना सहभागी होण्यास संस्थेकडून मज्जाव करण्यात आल्याने येथील कार्यक्रमच रद्द करण्याची वेळ कार्यक्रम आयोजक विद्यार्थ्यांवर आली आहे. संस्थेबाहेरील कुणालाही कार्यक्रमात सहभागी होऊ देण्याची परवानगी संस्थेनी दिली नसल्याने हा कार्यक्रम रद्द् करावा लागला आहे.

Sujat Ambedkar
माझा राग अमित ठाकरेंवर नव्हता; पण,...

डॅा. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त, १४ एप्रिला टीआयएसएस संस्थेमध्ये आंबेडकरवादी विद्यार्थी संघटनेने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी सुजात आंबेडकरांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. सुजात यांनीही या कार्यक्रमाला येण्याची तयारी देखील दाखवली होती. विद्यार्थी संघटनेने याबाबतचे पत्र हे ८ एप्रिलला संस्थेला दिले होते. त्यामध्ये प्रमुख पाहुणे कोण असणार याचाही तपशीलही देण्यात आले होता. या कार्यक्रमाचे आयोजन तीन दिवसाठी करण्यात आले होते. मात्र, संस्थेने परवानगी नाकारल्यामुळे एकाच दिवसाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मात्र, संस्थेने या कार्यक्रमासाठी बाहेरील कुणाही व्यक्ती सहभागी होण्यास मज्जाव केल्याने सुजात यांना या कार्यक्रमात सहभागी होणे शक्य नव्हते. अखेर हा कार्यक्रमच रद्द करण्याची वेळ आयोजक विद्यार्थ्यांवर आली आणि कार्यक्रम झाला नाही.

Sujat Ambedkar
मोदीजी कट्टरवाद्यांना आवरा...देशातील महत्वाच्या नेत्यांनी केले आवाहन..

दरम्यान, टीआयएसएस संस्थेच्या परिसरात अनेक कार्यक्रम होत असतात. या परिसरात काही दिवसांपुर्वी शासकीय अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण झाले आहे. तर एका अहवालाचे प्रकाशनही झाले. या कार्यक्रमांना अनेक बाहेरील व्यक्तींची उरस्थिती होती. तसेच, येथील मैदानावर होळी खेळण्यासही संस्थेने परवानगी दिली गेली होती. अशी माहिती विद्यार्थ्यांनी सांगितली आहे. इतर कार्यक्रमांना बाहेरील व्यक्तींच्या उपस्थितीवर निर्बंध घालण्यात येत नाहीत. मात्र, असे असताना सुजात यांनाच परवानगी नाकारण्याचे कारण काय, असा सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com